मतदान करायचं ना ! वोटर स्लीप मिळाली का
राहुरी - विशेष वृत्त
राहुरी शहर व परिसरातील मतदान केंद्र प्रमुखांकडून ( बीएलओ ) शहरातील मतदारांना वोटर स्लिप ( मतदार माहिती चिट्ठीचे सध्या वितरण सुरू झाले आहे .
37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील 223 राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण 360 मतदान केंद्रे आहेत . त्यातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 178 मतदान केंद्रे आहेत. राहुरी शहर व परिसरात 32 मतदान केंद्रे असून ती शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे माध्यमिक विद्यालय , कै. ल.रा.बिहाणी विद्यामंदिर प्रशाला , प्रगती विद्यालय आणि नूतन मराठी शाळा अशा ठिकाणी ही मतदान केंद्रे आहेत .
राहुरी शहरात साधारणतः 32 हजार 752 इतके मतदार संख्या आहे . याशिवाय पंचक्रोशीतील येवले आखाडा , जोगेश्वरी आखाडा ,वराळे वस्ती ,तनपुरे वाडी , पिंपळाचा मळा , आदी ठिकाणी देखील मतदारांची व्याप्ती वाढलेली आहे . सध्या मतदान केंद्र प्रमुख अर्थात वोटर स्लिप चे वितरण सुरू करण्यात आले आहे . बीएलओ मतदारांच्या घरोघरी जाऊन या वोटर स्लिप देत आहेत . या वोटर स्लीपर मतदाराच्या नावासह त्याचा भाग क्रमांक , मतदान केंद्राचे ठिकाण , तारीख , वेळ. आदीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे . याशिवाय मतदान केंद्राचा डिजिटल नकाशा देखील समाविष्ट असून मतदाराला एक ठराविक क्यू आर कोड देखील या वोटर स्लीपर नमूद करण्यात आला आहे . एकंदरीतच सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वितरित होत असलेल्या वोटर स्लिप ची शहर व परिसरात चर्चा सुरू झाली आहे .
निवडणूक आयोगाने मोठ्या संख्येने व अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी अनेक उपाय योजिले आहेत . राहुरी शहरात पाच ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र असतील याशिवाय 17 मतदार संघातील निम्म्या मतदान केंद्रांवर लाईव्ह वेब कास्ट अर्थात व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असेल .
अधिकाधिक मतदानासाठी प्रबोधन मंचाचे प्रबोधन -
राहुरी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी प्रबोधन मंचाच्या वतीने मतदारांचे प्रबोधन करत मतदानाचे महत्त्व पटवून अधिकाधिक संख्येने मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे .
त्यातच सध्या घरोघरी मतदारांना वोटर स्लिप चे वाटप होत आहे त्यामुळे उत्सा अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे .
Post a Comment
0 Comments