राहुरीच्या नवीपेठेत नाल्यावरील चेंबरला बारदाण्याचे आच्छादन !! अंदाज नसल्याने जेष्ठ नागरिक हैराण
राहुरी - विशेष वृत्त
यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच अनेक ठिकाणी नालेसफाई सुरू असताना राहुरी शहरातील नवी पेठेत नाल्यांवर चेंबर ऐवजी अक्षरशः बारदाण्याचे आच्छादन लावल्याने नागरिकांच्या नजरेत दिसून येत आहे .
नवी पेठेतील वर्दळीच्या ठिकाणी पालिकेच्या नाल्यावरील चेंबरवर ढाप्याऐवजी अक्षरशः बारदाण्याची आच्छादन लावलेले असून सांडपाण्याच्या गटारामुळे आजूबाजूला दुर्गंधी तर पसरत आहेत. वर्दळीच्या वेळी काही ज्येष्ठ नागरिक व महिला अंदाज न आल्याने या ठिकाणी पडल्याचे सांगितले जात आहे .
( गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी अनेक ज्येष्ठ नागरिक , महिला चेंबर लक्षात न आल्याने दुखापतीला कारणीभूत ठरले )
पावसाळा सुरू व्हायला काही दिवस राहिले असताना ठिकठिकाणी पालिका , नगर पंचायत ,महापालिका हद्दीतील नाल्यांची जोरदार सफाई सुरू आहे . याशिवाय अन्य नाल्यांवरील चेंबरवर धापे टाकणे, नादुरुस्त धापे बदलणे , खड्डे बुजवणे , रस्त्यांवर धोकादायक फांद्या काढणे , अशी विविध कामे यात आपत्कालीन सेवा म्हणून येतात . मात्र राहुरी शहरातील नवीपेठ मध्ये अनेक गटारीच्या चेंबरवर धापे नसल्याने दुर्गंधी पसरत असून पेठेतील जुन्या सरकारी दवाखान्यासमोर तर या चेंबरवर बारदानचे झाकण लावल्याचे दिसून येत असल्याने अनेकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे .
राहुरी नगरपालिकेवर सध्या प्रशासकीय राज्य असून नागरिकांनी नेमकी तक्रार कोणाकडे करायची ? असा प्रश्न सर्वसामान्य राहुरीकरांना पडला आहे . पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांवरील चेंबरची पाहणी करून उघड्या चेंबर वर धापे टाकावे , अन्य दुरुस्त्या कराव्या अशी मागणी राहुरी शहरातून केली जात आहे
Post a Comment
0 Comments