कुंदनशेठ सुराणा ठरले नगर मनमाड रस्त्यावरील बेदरकार वाहतुकीचे बळी
राहुरी - विशेष वृत्त
नगर मनमाड रस्त्यावरील वाढलेल्या मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीमुळे राहुरी शहराच्या रस्त्यावर याचा मोठा ताण आलेला आहे . आज या रस्त्याच्या बेदरकार वाहतुकीचा शहरातील नागरिकाचा बळी घेतला आहे .
राहुरीला बायपास रस्ता किंवा बेदरकार वाहतुकी मध्ये सुधारणा केव्हा होणार ? असा संतप्त सवाल राहुरीकरांकडून केला जात आहे .
राहुरी शहरातील जुन्या पिढीचे प्रथित यश व्यापारी कुंदनमल मानकचंद सुराणा हे राहुरी बस स्थानकासमोर दुचाकीने जात असताना भरगाव गाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर खाली सापडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली .
नगर मनमाड रस्त्यावर राहुरी शहरात दोन्ही बाजूंनी शहर विखुरलेले गेले असल्याने रस्त्यावर ये जा करताना रस्ता ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावे लागते . बाहेरील राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या करणारी वाहनांची संख्या पाच पटीने वाढलेली असून याचा ताण राहुरी शहरातील या महामार्गावर होत आहे .
गेल्या अनेक काळापासून हा प्रश्न प्रलंबित आहे , एखाद्या नागरिकाचा बळी गेल्यावर सुधारणा होणार काय ? असा प्रश्न नेहमी विचारला जात होता . अशातच ज्येष्ठ नागरिक कुंदनमल सुराणा वय 67 यांचा या बेदरकार वाहतुकीने आज बळी गेला आहे .
Post a Comment
0 Comments