पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक जाणीव व पुरोगामी वारसा जपला
- प्रा. डॉ. भाऊसाहेब नवनाथ नवले यांचे मत प्रतिपादन
सात्रळ, :
ग्रामीण भागाच्या परिवर्तनाची नस जाणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील अग्रभागी होते.
त्यांनी स्वतःची वास्तव जीवन कहाणी 'देह वेचावा कारणी' या आत्मकथनात सांगितली आहे. खासदार साहेबांनी माणसं आणि समाज जोडला. त्यांना आयुष्यभर समाजाचं पाठबळ लाभलं. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्याकडून लाभलेली सामाजिक जाणीव व पुरोगामी वारसा पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जपला, असे मत प्रतिपादन सात्रळ महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. भाऊसाहेब नवनाथ नवले केले.
सात्रळ (ता. राहुरी) येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचा ९२ वा जयंती समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील हे होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, तसेच श्री. तानाजी पाटील धसाळ, निंभेरे गावचे सरपंच डॉ. श्री. शांताराम सिनारे, श्री. नंदकुमार गागरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्या प्रा. डॉ. जयश्री सिनगर, श्री. महेंद्र तांबे, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. एकनाथ निर्मळ, प्रा. आदिनाथ दरंदले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे म्हणाले, "प्रवरा परिसराचे लाडके लोकनेते, अभ्यासू खासदार अशी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची ओळख होती. शेतीतज्ज्ञ व समाजसुधारक व्यक्तिमत्व असणाऱ्या बाळासाहेबांनी तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला." याप्रसंगी मार्गदर्शन करताना मा. श्री. तानाजी धसाळ पाटील म्हणाले,"खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी गोरगरिबांच्या अडचणी सोडवल्या. त्यांच्या बारीक सारीक गोष्टीही लक्षात राहायच्या. त्यांच्यासमोर प्रवरा ग्रामीण विद्यापीठ उभा राहिले. जैविक युद्ध आणि जलयुध्द संदर्भात त्यांनी केलेली मांडणी दूरदृष्टीची होती. व्यासंगी, अभ्यासू बाळासाहेबांच्या सामाजिक विकास कार्याला आध्यात्मिक व नैतिक मूल्यांची बैठक होती."
अध्यक्षीय भाषण करताना ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील म्हणाले,"खासदारसाहेबांचे साधेपण आम्ही पाहिले व अनुभवले आहे. ते सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचे आणि त्या सोडवण्यासाठी स्वतः लक्ष घालायचे. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही त्यांनी जीव लावला." कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. गंगाराम वडीतके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रतिभा विखे यांनी केले.
Post a Comment
0 Comments