शेतीच्या रोटेशनसाठी उद्या शेतकरी येणार रस्त्यावर
राहुरी - विशेष वृत्त
राहुरी तालुक्यातील पिके जळत चाललेली असताना जलसंपदा विभागाने डावा कालव्याला पाणी न सोडल्याने आमदार प्राजक्त तनपुरे आणि डावा कालव्याखालील लाभधारक शेतकरी संतप्त झाले असून आज प्रशासनाला इशारा देऊनही कोणतेही हालचाल न झाल्याने उद्या सकाळी रस्त्यावर उतरण्याचा इशारा तनपुरेंसह शेतकऱ्यांनी दिला आहे .
त्यामुळे उद्या काय होणार ? याकडे मुळा धरण लाभक्षेत्रातील सर्वांचेच लक्ष लागले आहे . मुळा धरणातून शेतकऱ्यांच्या रोटेशनला पाणी देण्यासाठीचे श्रेय घेण्यासाठी नेमके कोण आडवे येत आहेत ? याचीही चर्चा जोरदार सुरू आहे .
दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल झाला आहे
चलो राहुरी...चलो राहुरी
मुळा डावा कालवा सर्व लाभधारक शेतकरी यांना कळविण्यात येते की आज दिनांक 16/5/2024 रोजी राहुरी येथे मा.तहसीलदारसाहेब यांना पाणी सोडण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते, तहसीलदारसाहेब व मुळा डावा कालवा अभियंता यांच्याशी चर्चा होऊन लाभधारक शेतकऱ्यांचे आजचे ठिय्या आंदोलन मागे घेऊन ठरल्याप्रमाणे संद्याकाळपर्यंत पाणी सोडणे अपेक्षित होते...परंतु पाणी सोडले नाही. तरी उद्या शुक्रवार दिनांक 17/05/2024 रोजी सकाळी 9:30 वाजता मुळा डावा कालव्याचे शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी सोडावं या मागणीसाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्याचे ठरविले आहे, तरी सर्व मुळा डावा कालवा पाणी वापर संस्था पदाधिकारी लाभधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं ही विनंती
*जय किसान*✊🏻
Post a Comment
0 Comments