Type Here to Get Search Results !

राहुरी तालुक्यातील वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

राहुरी तालुक्यातील वरवंडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार



राहुरी  - विशेष वृत्त

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे ढगे वस्तीवर घडली .

सकाळी पावणे आठच्या सुमारास वेदिका श्रीकांत ढगे अंगणात खेळत होती. गिन्नी गवतात बिबट्या लपून बसलेला होता. बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी घरातील सर्वांनीच आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्या पलायन केले. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीरित्या जखमी झाली कुटुंबीयांनी व आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला .
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे सहकारी वनविभागाचे वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे , वनरक्षक सतीश जाधव , गाडेकर , आदी कर्मचारी रवाना झाले .
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याचा संचार वाढला असून शेजारी राहता , श्रीरामपूर तालुक्यात मानवी  वस्त्यांवर  बिबट्यांची वर्दळ वाढलेली आहे . राहुरी तालुक्यात वरवंडी सारख्या ठिकाणी बिबट्याचे हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे .

Post a Comment

0 Comments