Type Here to Get Search Results !

महामार्गावर व्यापाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासन ॲक्शनमोडवर

राहुरीत महामार्गावर व्यापाऱ्याचा बळी गेल्यावर प्रशासन येतेय ॲक्शन मोडवर

 राहुरी - विशेष वृत्त




राहुरी शहर परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चार दिवसांपूर्वी बस स्थानकासमोर  प्रतिष्ठित व्यापाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची दखल घेऊन आपल्या विविध मागण्यांसाठी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.


व्यापारी असोसिएशन तहसीलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी शहरालगत असणाऱ्या नगर मनमाड महार्गावर १८ मे शहरातील जेष्ठ व्यापारी कुंदनमल सुराणा यांचा अपघात होवून जागीच मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसां पासून असे अनेक छोटे मोठे अपघात या महामार्गावर शहरानजीक होत असतात. 

त्यामुळे राहुरी शहर परिसरातील पाण्याची टाकी ते बालाजी मंदिर परिसर रस्त्याच्या कडेने पांढरी पट्टी मारणे , राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील अतिक्रमणांवर निर्बंध घालणे , व अस्ताव्यस्त वाहतूक सुरळीत करणे , राहुरी शहरात वाहतुक व्यवस्थापन घालून देणे , अतिक्रमण निर्बंध टाकणे यावर चर्चा झाली. 


राहुरी शहरातील राजमाता जिजाऊ चौक येथे वाहतुक सिग्नल चालू करणे व कायमस्वरूपी वाहतूक पोलिस यांची नियुक्ती करणे, संत गाडगेबाबा आश्रम शाळा, बसस्थानक चौक तसेच धावडे पेट्रोल पंप समोरील नगर मनमाड रस्तावर गतिरोधक बसवून त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत ,असे निवेदनात म्हटले आहे. 


यावेळी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, अनिल कासार, सुर्यकांत भूजाडी, संजीव उदावंत, संतोष लोढा, बाळासाहेब उंडे, कांता तनपुरे, प्रविण ठोकळे, गणेश नेहे, अख्तर कादरी, सचिन वने, दिपक मुथ्था, नवनीत दरक, अक्षय तनपुरे, संतोष आळंदे, अशोक घाडगे, सुहास कोळपकर आदिंसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments