Type Here to Get Search Results !

राहुरी बसस्थानक लवकरच अद्ययावत ; तात्पुरते बसशेड तयार होतय

 राहुरी बसस्थानक लवकरच अद्ययावत ; तात्पुरते बसशेड तयार होतय

राहुरी - विशेष वृत्त


बहुचर्चित अशा राहुरी बसस्थानकाची लवकरच अद्ययावत पुनर्बांधणी होणार आहे . याच्या प्राथमिक तयारीसाठी बसस्थानकाच्या उत्तरेला नियंत्रण कक्षासह प्रवाशांसाठी शेडचे काम अंतिम टप्प्यात आहे . लवकरच बसस्थानकाच्या भव्य आणि दिव्य इमारतीचे काम सुरू होणार आहे .



ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे , माजी मंत्री विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून या भव्य व स्थानकाचे काम लवकरच होणार आहे .

(  मागील  काळात  ज्येष्ठ  नेते  माजी  खासदार  प्रसाद  तनपुरे यांनी  मोडकळीस आलेल्या  याच  बसस्थानकाला भेट  दिली  होती . परिवहन  विभागाच्या  वरिष्ठांना  सूचनाही  केल्या  होत्या , असा  हा  एक्सक्लू  फोटो  आहे  )

यापूर्वी राहुरीतील तनपुरे कुटुंबीयांनी प्रयत्न केलेल्या अनेक विकास कामांना अन्य काही लोकांकडून खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा राहुरी शहर व परिसरात होत होती .
वर्षभरापूर्वी माजी मंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी बस स्थानकाची पुनर्बांधणी या अत्यंत महत्वाच्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष , व्यवस्थापकीय संचालक , उपमहाव्यवस्थपक (स्थापत्य) यांची भेट घेऊन पाठपुरावा करत सविस्तर चर्चा केली होती.
या बैठकीत नवीन बसस्थानकाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने चर्चा होत बसस्थानकातील नियोजित दहा प्लॅटफॉर्मशिवाय अधिकचे दोन ते तीन प्लॅटफॉर्म वाढविण्याची सूचना यावेळी आमदार तनपुरे यांनी केली होती. लवकरच सुधारित आराखडा तयार करून त्यानंतर टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल , असे सांगितले होते.
राहुरी तालुक्याच्या विस्तार मोठा आहे. त्यामुळे दररोज येथून राज्यभर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील अधिक आहे. त्यादृष्टीने भव्य आणि सुसज्ज असे बसस्थानक उभे राहावे यासाठी आपण प्रयत्नशील आहे , असे सोशल मीडियावर तनपुरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले होते . तनपुरे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना तालुक्यातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे .
राहुरी तालुक्यातील पोलीस स्टेशनसह पोलीस वसाहत ,  राहुरी महसूल प्रशासकीय इमारत , पंचायत समिती कॉलनी , ग्रामीण रुग्णालय इमारत , जलतरण तलाव ,या महत्त्वाच्या विषयांबरोबरच राहुरी बस स्थानकाचा प्रश्न मोठ्या काळापासून प्रलंबित आहे .

Post a Comment

0 Comments