राहुरी शहरात १२ मे रोजी श्री स्वामी समर्थांच्या स्वयंभू पादुकांच्या पालखीचे आगमन !
राहुरी प्रतिनिधी
राहुरी शहरात दिनांक १२ मे रोजी श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन होत असून यामध्ये स्वामींच्या स्वयंभू पादुका आहेत .
राहुरी मध्ये या पालखीचे सलग २७ वे वर्ष असून येथील भाविक भक्त या पालखीचे दर्शन गोरगरिबांना घडावे म्हणून दरवर्षी
नित्यनेमाने पालखी राहुरी येथे आणून भाविकांसाठी पालखीचे दर्शन उपलब्ध करून देत असतात ज्याभाविकांना अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी ही एक पर्वणी मानली जाते
दरम्यान या पालखीचे रविवार दिनांक १२ मे २०२४ रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल भाग्यश्री येथे आगमन होईल.
आगमन झाल्यानंतर येथे स्वयंभू पादुकांची पाद्य पूजा करण्यात येईल.
व त्यानंतर दुपारी पाच वाजता राहुरी शहरातील श्री संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाच्या इमारतीमध्ये श्री स्वामींची पालखी भक्तांच्या दर्शनासाठी ठेवली जाईल
त्यानंतर सायंकाळी सहा वाजता राहुरी शहरातून मोठ्या उत्साहात वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढली जाईल व राहुरी शहरातून पालखीची मिरवणूक निघल्यानंतर सायंकाळी पालखी श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे गोकुळ कॉलनी येथे असलेल्या इमारतीत पालखी विराजमान होईल व त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता श्री स्वामींची महाआरती करण्यात येणार असल्याचे भाविक भक्तांनी सांगितले आहे.
तरीपण राहुरी शहरातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मिरवणुकीत सहभागी होऊन सायंकाळी महाआरतीचा लाभ घेण्याचे आवाहन भाविकभक्तां तर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments