शिवसेना नेते उद्धव ठाकरेंच्या सभेने हवा फिरणार काय ? चर्चा
श्रीरामपूर - विशेष वृत्त
तिरंगी लढत होणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांची जादू चालणार काय ? असा प्रश्न मतदार संघात विशेषतः श्रीरामपूर , राहुरी , देवळाली प्रवरा आदी भागात विचारला जात आहे .
शिर्डी लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सत्ताधारी खासदार सदाशिव लोखंडे रिंगणात उभे असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे असून , वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा ताई रुपवते निवडणूक रिंगणात उभे आहेत . त्यामुळे ही तिरंगी लढत शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वांनाच प्रतिष्ठेची बनली आहे .
विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बाबतीत मतदार संघातील श्रीरामपूर विशेषतः राहुरी तालुक्यातील अनेक भागात नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची कामे केली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत . अनेक ठिकाणी तर खासदारांचे दर्शनही झाले नसल्याच्या चर्चा आहेत . या पार्श्वभूमीवर लोखंडे यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळाल्यामुळे महायुतीने ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात जातीने लक्ष घातले आहे .
त्यांच्या संगमनेर श्रीरामपूर येथे प्रचार सभा झाल्या . याचा लोखंडे यांना किती फायदा होतो , हा प्रश्न कायम आहे . मतदारसंघातील अनेक भाजप नेते अक्षरशः भूमिगत झाल्याचेही चित्र असून त्याचा नेमका कोणाला फायदा होणार ? याची चर्चा सध्या सुरू आहे .
महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची श्रामपुरात सभा होत असून या सभेमुळे लोखंडे यांची हवा बदलणार काय याची सध्या चर्चा सुरू आहे . तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा ताई रूपवते या कोणाला भारी पडणार याकडे शिर्डी मतदारसंघातील मतदारांची लक्ष लागून राहिले आहे .
Post a Comment
0 Comments