कृषी विभागातील कृषी सेवक पदाची निवड प्रसिद्ध होऊनही कागदपत्रांची अद्याप पडताळणी नाही ?
नगर / संभाजीनगर - विशेष वृत्त
कृषी विभागातील कृषीसेवक पदाची निवड यादी प्रसिद्ध करुन ही कागदपत्रे पडताळणी अद्याप सुरू केलेली नाही. मात्र तलाठी, शिक्षक तसेच जिल्हा परिषद मधील विविध पदांची कागदपत्रे पडताळणी प्रकिया सुरू असताना कृषि सेवक कागदपत्रे पडताळणीलाच विलंब का ? त्यामुळे निवड यादीमधील उमेदवार विचारणा होत आहे.
याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे ,अशी मागणी मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील अनेक कृषी सेवक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवार आणि त्यांच्या पालकांच्या वतीने विचारणा केली जात आहे .
कृषि विभागाने जवळपास ४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयबीपीएस कंपनी सोबत करार करुन सप्टेंबर २०२३ मध्ये १५५५ (अनुसूचित क्षेत्रातील जागा वगळता) जागेसाठी कृषि सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी दहावी
माध्यमातून परीक्षा घेण्यात आली. आणि दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १२ मार्च २०२४ रोजी निकाल घोषित केला. त्यानंतर कृषी विभागाने तत्परता दाखवत ३ दिवसानंतर म्हणजे १५ मार्च २०२४ रोजी तात्पुरती अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली.
परंतु संभाजीनगर कृषी विभागाचे कोठे घोडे अडले माहित नाही, अद्याप संभाजीनगर कृषी विभागाने तात्पुरती अंतरिम गुणवत्ता याद्या प्रसिद्ध केलेली नाही. निवड याद्या प्रसिद्ध होऊनही कागदपत्रे पडताळणी अद्याप ही रखडली आहे. कागदपत्रे पडताळणी सुरू करावे यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी मागील काही दिवसांपूर्वी कृषी विभाग अमरावती तसेच इतर कृषी विभागाला ईमेलद्वारे निवेदन दिले असता कृषी विभाग अमरावती यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण सांगितले.
परंतु महाराष्ट्रात महसूल विभागातील तलाठी पदाचे असोत, शिक्षण विभागातील शिक्षक भरतीचे कागदपत्रे पडताळणी आचारसंहिता मध्ये सुरू आहेत. त्यासोबतच जिल्हा परिषद भरती मधील विविध पदांची कागदपत्रे पडताळणी प्रकिया सुरू केलेल्या आहेत. इतर सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरू असलेल्या पदांची कागदपत्रे पडताळणी सुरू आहे. मग कृषी विभागालाच कागदपत्रे पडताळणीचे वावडे का ? अशी विचारणा निवड यादीमधील उमेदवार करत आहेत.
याबाबत कृषी विभागाने दखल घेऊन निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
Post a Comment
0 Comments