Type Here to Get Search Results !

केदारनाथ बद्रीनाथ चारधाम यात्रेसाठी भाविकांचा उत्साह कायम

 केदारनाथ बद्रीनाथ चारधाम यात्रेसाठी भाविकांचा उत्साह कायम 



चारधाम - प्रसाद मैड विशेष वृत्त 




गेल्या 20 ते 25 दिवसांपासून सुरू असलेल्या चार धाम यात्रेला भाविकांचा उत्साह कायम दिसत असून उत्तराखंड शासन , पोलीस यंत्रणा अणि चार धाम यात्रा निगमच्या वतीने कडेकोट बंदोबस्त व्यवस्था , ठेवण्यात आली असून यात्रा सुरळीतपणे सुरू आहे .



10 मे पासून चारधाम यात्रा सुरू होताच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने देशभरात यात्रा चर्चेत आली. सध्या यात्रा मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून नोंदणी अणि पडताळणी झाल्याशिवाय कोणालाही गंगोत्री , यमुनोत्री, केदारनाथ , बद्रिनाथला प्रवेश नाही . घेण्या अनेक कालखंडापासून ही चारधाम यात्रा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असून महाराष्ट्रातील लाखो भाविक यात दरवर्षी सहभागी होतात .

आज प्रस्तुत प्रतिनिधी चारधाम यात्रेत सहभागी झाले असल्याने काही बाबी व यात्रे बाबत माहिती विशद करत आहे . 

चारधाम यात्रा करणाऱ्या भाविकांनी नोंदणी करूनच यात्रा करावी , काळजी घ्यावी , आवश्यक कपडे आदीची खात्री करूनच यात्रा करावी .

उत्तराखंड प्रशासन अलर्ट मोडवर असल्याने सोशल मीडिया वरील काही भ्रामक पोस्ट वर विश्वास न ठेवता आपली यात्रा सुखकर करावी .

Post a Comment

0 Comments