Type Here to Get Search Results !

राहुरीत विकासकामी युवानेता ॲक्शन मोडवर

राहुरीत विकासकामी युवानेता ॲक्शन मोडवर

राहुरी - विशेष वृत्त



लोकसभा निवडणुकीच्या यशस्वी निकालानंतर राहुरी येथील तनपुरे गट सक्रिय झाला असून शहरातील विकास कामाबाबत ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे .

गेल्या मोठ्या कालखंडापासून राहुरी नगरपरिषदेवर मुख्याधिकारी यांचा प्रशासक राज आहे . सध्या प्रशासक म्हणून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे काम पाहत असून गेल्या दीड वर्षापासून ठोंबरे यांच्या कार्यकाळात राहुरी शहरातील अनेक विकास काम थंडावली तर आहेतच मात्र रस्ते खोदाई , पिण्याचे पाणी , काही योजनांच्या कामामुळे शहराची घडी पुरती विस्कटलेली आहे.
लोकसभा निवडणुकीचा काळ असल्याने शहरवासीयांचे हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी अवस्था झालेली होती . लोकसभा निवडणूक निकाल होताच एकंदरीत वातावरण खुले झाल्याची दिसून येत आहे . शहरातील समस्या , संकट , तक्रारी याबाबत नागरिक सत्ताधारी गटालाच जबाबदार धरत होते . त्यामुळे सत्ताधारी तनपुरे गट हा रोशाला सामोरे जात होता .
आज विविध प्रश्नांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेता हर्षदादा तनपुरे यांनी योग्य वेळ साधत  शहरातील विकास कामांबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री ठोंबरे यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करत विचारणा केली. यावेळी मोठ्या संख्येने युवा नेता हर्षदादा तनपुरे यांच्या सोबत शहर व विविध परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.  मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,  राहुरी शहर व उपनगर मधील भुयारी गटार योजनेच्या चालु असलेल्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यावर मुरुम अथवा क्राँक्रीटीकरण करणे बाबत  राहुरी शहरातील सर्व नागरीक पदाधिकारी व नगरसेवक विनंती करतो की, गेल्या 6 महिन्यापासुन सुरु असलेल्या भुयारी गटार योजना कामामुळे शहरातील रस्ते अतिशय खराब झालेले असुन सद्य स्थितीत सुरु असलेल्या पावसाळ्यामुळे नागरीकांना घरा बाहेर पडणे मुश्कील झालेले आहे. सदरचे रस्ते पावसामुळे खचुन गेले असुन मोठे मोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे अपघात होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

तरी आमच्या मागणीचा तात्काळ विचार करुन त्वरीत संबधीत रस्त्यावर मुरुम टाकुन रोलींग अथवा क्राँक्रीटीकरण करावे हि विनंती. अन्यथा शहरातील व उपनगरातील नागरीकांच्या वतीने नगरपालिकेसमोर भव्य आंदोलन करण्यात येईल गंभीरतेने नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments