Type Here to Get Search Results !

परवाच घेतला अकरावीत प्रवेश अन आज तिने संपवली जीवनयात्रा

परवाच घेतला अकरावीत प्रवेश अन आज तिने संपवली जीवनयात्रा

राहुरी - विशेष वृत्त

 राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील आरडगाव चौकात घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

 


याबाबत समजेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा परिसरातील दवणगाव रोडवरील रहिवाशी असलेली जागृती विश्वास शिंदे ही राहुरी फॅक्टरी येथील एका खासगी शाळेत इयत्ता १० वीच्या परीक्षेत शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाली होती. दोन दिवसापूर्वी तिने देवळाली प्रवरातील महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. 

 

आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता जागृती शिंदे ही सायकल घेऊन देवळाली गावात येथे खासगी क्लाससाठी घरा बाहेर पडली. तिने क्लासला न जाता टाकळीमिया येथील आरडगाव चौकी येथे पोहोचून रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी हनुमंत आव्हाड यांनी धाव देऊन पंचनामा केला. जागृती शिंदे हिचा मृतदेह रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जागृती हिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments