Type Here to Get Search Results !

सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात नवोगतांचे स्वागत....

 सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात नवोगतांचे स्वागत....

सात्रळ - सुनील सात्रळकर



 रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी येथे नवीन प्रवेश घेतलेल्या इ.५ वी ते १० वी अखेर सर्व नवोगतांचे स्वागत आनंददायी वातावरण करण्यात आले.

       याप्रसंगी सात्रळचे सरपंच सतिश ताठे ग्रामपंचायत सदस्य सागरभाऊ डुक्रे,न्यू इंग्लिश आश्वी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक पोपटराव पवार ,संकुलाचे प्राचार्य राजेंद्र बडे, पर्यवेक्षिका सुशीला थोरात आदि मान्यवरांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली. 

       सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठय़पुस्तकांचे वितरण व नवोगतांचे स्वागत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोपटराव पवार यांनी मुलांना गोष्टी सांगत मार्गदर्शन केले.

          कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख विलास गभाले नियोजन केले तर जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशीनकर गुरुकुल प्रमुख सच्चिदानंद झावरे,केशव मुसमाडे, सतिश नालकर, प्रकाश कुलथे प्रा.विलास दिघे,प्रा.पंकज दिघे,प्रा.सतीश कदम,प्रा.अण्णासाहेब गोरडे,संजू दिघे,युनूस पठाण,भारत कोहकडे,ज्ञानदेव लेंडे, सुदर्शन गिते, वैभव वसावे, सुमेध शिंदे, देविदास थोरात, शिवदास सातपुते, सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी, प्रा.अर्चना बनसोडे,संगिता सांगळे,प्रविणा दिघे, कावेरी वदक,प्रमिला बनगये रत्नाकर सोनवणे, ज्ञानदेव माळी, राजू पेटारे,रामदास साबळे यांनी परिश्रम घेतले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास गभाले यांनी केले तर आभार प्राचार्य राजेंद्र बडे यांनी मानले...

Post a Comment

0 Comments