Type Here to Get Search Results !

सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात योगा दिन उत्साहात साजरा

 सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात योगा दिन उत्साहात साजरा



सात्रळ - सुनील सात्रळकर

 रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी येथे योगा दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आला .

       याप्रसंगी योगाचार्या पोपटराव पवार यांनी योगा दिनाचे महत्त्व सांगून योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली त्यांच्यासोबतच संकुलाचे प्राचार्य राजेंद्र बडे यांनीही योगासने करत विद्यार्थ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला..




      सकाळच्या प्रसन्न वातावरणात विद्यार्थ्यांनी शांततेत योगासने करत भविष्यात आरोग्य निरोगी ठेऊ असा संदेश जणू मुलांच्या प्रात्यक्षिकांतून वाटत होता.

          कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षिका सुशीला थोरात यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख विलास गभाले नियोजन केले तर जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशीनकर गुरुकुल प्रमुख सच्चिदानंद झावरे,केशव मुसमाडे, सतिश नालकर, प्रकाश कुलथे प्रा.विलास दिघे,प्रा.पंकज दिघे,प्रा.सतीश कदम,प्रा.अण्णासाहेब गोरडे,संजू दिघे,युनूस पठाण,भारत कोहकडे,ज्ञानदेव लेंडे, सुदर्शन गिते, वैभव वसावे, सुमेध शिंदे, देविदास थोरात, शिवदास सातपुते, पूरब सुर्यवंशी,सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी, प्रा.अर्चना बनसोडे,संगिता सांगळे,प्रविणा दिघे, कावेरी वदक,प्रमिला बनगये रत्नाकर सोनवणे, ज्ञानदेव माळी, राजू पेटारे,रामदास साबळे यांनी परिश्रम घेतले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास गभाले यांनी केले तर आभार प्राचार्य सच्चिदानंद झावरे यांनी मानले...

Post a Comment

0 Comments