नव्या संसदेत पहिल्यांदाच निनादला रामकृष्ण हरीचा आवाज
विशेष वृत्त - सतर्क खबरबात जिल्ह्याची
चौदाव्या लोकसभेच्या खासदारांच्या सध्या खासदारकी ची शपथ कालपासून नव्याने निर्माण झालेल्या नव्या संसद भवनात सुरू आहे .
आज दुसऱ्या दिवशी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी आपल्या खासदारकीची शपथ चक्क इंग्रजी मधून तर घेतलीच , शेवटी जय हिंद , जय महाराष्ट्र म्हणत संसदेला हात जोडले. संसद नवीन इमारतीमध्ये प्रथमच रामकृष्ण हरी चा आवाज निनादल्याने तमाम मराठी जणांचे मन भारावल्याचे एकूणच चित्र दिसून येत आहे.
संसदेत नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यामुळे नगर जिल्ह्यातील मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे . निवडणुकीच्या प्रचार काळात इंग्लिश शिक्षणावरून बोलण्यावरून जोरदार शाब्दिक धुमश्चक्री पहावयास मिळाली होती. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी इंग्लिश मध्ये शपथ घेऊन एक प्रकारे आपल्या कार्याची चुणूक दाखवल्याचे चर्चा सुरू आहे .
Post a Comment
0 Comments