आमदारांच्या या ज्वलंत प्रश्नावर एन एच ए आय चे अधिकारी निरुत्तर
राहुरी - विशेष वृत्त
गेल्या तीन वर्षापासून अनेकांचे बळी गेलेल्या या नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी होणार ? असा संतप्त सवाल करतात एन एच ए आय प्राधिकरणाचे अधिकारी निरुत्तर झाले . राहुरीतील तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात नागरिकांनी रस्त्याबाबत रोष व्यक्त करताच तनपुरे यांनी हा सवाल केला .
राहुरी नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती व नवीन चालू असलेले काम वेगाने झाले न झाल्यास अधिवेशनानंतर मोठे जन आंदोलन हाती घेतले जाईल, असा निर्वाणीचा इशारा माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
गुरुवारी आमदार तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांनी नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेची कहाणी कथन केली. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर हजारो जणांना कायमचे अपंगत्व आले असल्याचे नागरिकांनी तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याच्या कामाचा दर्जा तसेच संथगतीने सुरू असलेले काम यामुळे रस्त्याने ये-जा करणारे
प्रवासी व नागरिकांची मोठी हेळसांड होत आहे. यासह अनेक तक्रारी नागरिकांनी आमदार तनपुरे यांच्या पुढे मांडल्या.
तनपुरे यांनीही संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून नागरिकांसमोर प्रश्नांची सरबत्ती केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रस्त्याचे काम ठप्प झाले तसेच ठिकठिकाणी असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा वेगही मोठ्या प्रमाणात मंदावला. रस्ता कधी पूर्ण होणार, असा प्रश्न तनपुरे यांनी उपस्थित केला. त्यावर अधिकारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी निरुत्तर झालं.
विधानसभा सत्र काळात रस्त्याच्या कामाने वेग पकडला नाही व दुरुस्ती झाली नाही तर मोठा रास्तारोको केला जाईल, असा इशारा तनपुरे यांनी दिला. तसेच कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आग्रही राहू, असा इशाराही तनपुरे यांनी दिला. रस्त्याच्या कामाचे प्रकल्प संचालक झोडगे, ठेकेदार रुद्रानी, प्रवीण खादवे यानी आश्वासित केल्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला. या रस्त्याच्या कामात अनेक नागरिकांचा बळी गेलेला असून तीन वर्ष पूर्ण होत आले तरी काम पूर्ण झालेली नाही . बळी गेलेल्या नागरिकांच्या अनेक नातेवाईकांनी यावेळी रुद्ररूप धारण केले होते . आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले कमी कालावधीत दर्जेदार व चांगले काम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुदत मागितली , ती यावेळी मान्य करण्यात आली .
Post a Comment
0 Comments