Type Here to Get Search Results !

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राहुरीत उत्साहात स्वागत हजारो वारकऱ्यांची राहुरीत मांदियाळी

 संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राहुरीत उत्साहात स्वागत हजारो वारकऱ्यांची राहुरीत मांदियाळी







राहुरी  - विशेष वृत्त

त्र्यंबकेश्वर हून पंढरीकडे जाणारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे राहुरी शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले . शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालयात आज पालखी मुक्कामाला असून उद्या सकाळी ती डोंगरगण , नगर मार्गे पंढरीकडे प्रस्थान करणार आहे .



पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अवघे राहुरी शहर  सज्ज झाले असून ठिकठिकाणी भाविकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत . स्थानिक प्रशासनासह विविध संस्था , संघटनांच्या वतीने देखील वारकऱ्यांसाठी चहा , नाश्ता , निवासासाठीची सोय आदींची व्यवस्था करण्यात आली आहे  .
संभाव्य पावसाच्या दृष्टीने ही पालिका व प्रशासन सज्ज झाले आहे .

दुसऱ्या वर्षीही निर्मल वारी अभियान -
गेल्या वर्षी निर्मल वारी अभियान राहुरीत राबवले गेले . वारकऱ्यांसाठी तात्पुरते शौचालयांची व्यवस्था , स्वच्छता , पर्यावरण पूरक व्यवस्था यासाठी 200 हून अधिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून यावर्षीही निर्मल वारी अभियान राहुरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्या अंतर्गत होत आहे . शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय , गाडगे महाराज आश्रम शाळा , केशर मंगल कार्यालय , शाहू मंगल कार्यालय , बालाजी मंगल कार्यालय , या ठिकाणी तात्पुरत्या पाचशेहून अधिक तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे . या ठिकाणी 300 हून अधिक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून उद्या दुपारपर्यंत काम करणार आहेत . संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी अवघे राहुरी शहर सज्ज झाले असून भाविकांचा मोठा उत्साह पहावयास मिळत आहे . पालखी सोहळा व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासनासह नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांच्याकडून चोख व्यवस्था आहे. 

Post a Comment

0 Comments