दोन नद्यांचे दोन रूप !! पहा
रुद्र प्रयाग - विशेष वृत्त
हेच ते ठिकाण ज्या ठिकाणावरून पवित्र नद्यांचा संगम होतो , होय रुद्रप्रयाग !!
चारधाम यात्रा अत्यंत पवित्र व महत्त्वाची मानली जाते. या यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात . यात्रा काळात देव प्रयाग , विष्णू प्रयाग , कर्णप्रयाग , नंद प्रयाग आणि रुद्रप्रयाग हे देखील महत्त्वाचे मानले जातात . यात्रेमध्ये रुद्रप्रयाग असे महत्त्वाचे ठिकाण आहे , ज्या ठिकाणी श्री अलकनंदा आणि श्री मंदाकिनी नदी यांचा संगम होतो .
या संगमावर एक नारद शीला आहे , ज्याचे वर्णन श्री केदार खंड मध्ये केलेले आहे .या संगमावरील नारद शिळेवर देवऋषी नारदांनी घोर तपस्या करून संगीताचे ज्ञान भगवान रुद्र म्हणजेच शंकराकडून प्राप्त केले होते.
प्रत्यक्ष दर्शन केले असता केदारनाथ होऊन येणारी मंदाकिनी नदी चे नितळ पाणी वाहताना दिसते , उगम पावलेल्या अलकनंदा नदीचे रुद्र रूप या ठिकाणी पहावयास मिळते . भाविकांनी जरूर या चारधाम यात्रेत रुद्रप्रयाग येथील संगमाला भेट द्यावी .
Post a Comment
0 Comments