Type Here to Get Search Results !

लोकसभेच्या निकालानंतरही " येथे " उत्साह कायम.......

लोकसभेच्या निकालानंतरही " येथे " उत्साह कायम.......



केदारनाथ बद्रिनाथ चारधाम - विशेष वृत्त

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा जल्लोष असतानाही केदारनाथ - बद्रीनाथ चारधाम यात्रेमध्ये भाविकांचा उत्साह तिसऱ्या आठवड्यानंतरही कायम असल्याचे दिसून येत आहे .




यमुनोत्री , गंगोत्री आणि केदारनाथ - बद्रीनाथ चार धाम यात्रा महत्त्वाची मानली जाते . लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ धाम येथील सोनप्रयाग या ठिकाणी भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला .
सोनप्रयाग येथून गौरीकुंड येथील गरम पाण्याच्या कुंडावर स्नान करून भाविक वेगवेगळ्या साधनांनी विशेषतः ऑनलाइन बुक केलेल्या हेलिकॉप्टर सेवेच्या माध्यमातून बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे .
उत्तराखंड पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी घाटांमध्ये दरड प्रवण क्षेत्र , गंगा , यमुना , मंदाकिनी आदी नद्यांच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये पोलीस यंत्रणा प्रशासन तैनात केले आहेत .
भाविकांचा उत्साह जरी मोठा असला तरी भाविकांनी नोंदणी व पडताळणी करूनच यात्रा सफल करावी . नियम व कायद्याचे पालन करून सहकार्य करावे , असे आवाहन उत्तराखंड प्रशासनाने केले आहे . या चार धाम यात्रेत महाराष्ट्रातील भाविकांची संख्या मात्र मोठ्या संख्येने दिसून येत आहे . सध्या चार धाम यात्रेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदलत्या वातावरणामुळे भाविकांच्या उत्साहात भर पडल्याचे चित्र दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments