राष्ट्रवादी नेता सपत्नीक अंबाबाईच्या दर्शनाला
राहुरी - विशेष वृत्त
लोकसभा निकालानंतर सर्वत्र जल्लोष असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक नेते माजी मंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अन्यत्र कोठेही न जाता कोल्हापूरची अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी पर्याय निवडला .
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्राजक्त व पत्नी सौ सोनाली ताई तनपुरे यांनी आज कोल्हापूरची अंबा मातेची सपत्नीक दर्शन घेऊन पूजा अर्चना केली . यावेळी तनपुरे यांनी सोशल मीडियावर आपले दर्शनाचे फोटोही शेअर केले .
अमेरिकेमध्ये पदवीधर शिक्षण झालेले प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या पत्नी सौ सोनाली ताई हे उच्च शिक्षित आहेत . समाज मनामध्ये त्यांची वेगळी क्रेझ निर्माण झालेली आहे . लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असताना अहमदनगर लोकसभा निवडणुकीत आमदार निलेश लंकेसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अथक परिश्रम घेतले . आमदार निलेश लंके खासदार झाले .
नेमके प्राजक्त तनपुरे यांचा लग्नाचा वाढदिवस 12 जून रोजी आल्याने तनपुरे पती-पत्नींनी कोल्हापूरच्या अंबा मातेचे दर्शन घेतले सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Post a Comment
0 Comments