" या " ठिकाणी जाणाऱ्या भाविकांची वाढली संख्या
केदारनाथ धाम - विशेष वृत्त
चारधाम यात्रे पैकी केदारनाथ धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या पुन्हा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे .अन्य ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची तात्काळ दर्शन होते , मात्र केदारनाथ येथे दर्शन पास बंद केल्याने एजंटांची वर्दळ वाढली असून सामान्य भाविकांना मात्र तासन्तास ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे .
चारधाम यात्रीपैकी केदारनाथ धाम यात्रा अत्यंत कठीण अशी समजली जाते . भाविकांना सोलप्रयाग येथून गौरीकुंड येथे खाजगी वाहनाने जावे लागते . तेथून पायी किंवा घोड्याच्या व्यवस्थेने ( 3 हजार मीटर उंच ) अशा केदारनाथ धाम येथे मोठा खडतर प्रवास करीत जावे लागते . हेलिकॉप्टरची सुविधा असून यातूनही दररोज शेकडोच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात . दर्शनासाठी भाविकांचा उत्साह कायम असला तरी मंदिर प्रशासनाच्या काही नियमांमुळे भाविकांना तासनतास दर्शनासाठी वाट पाहावी लागत आहे . केदारनाथ येथील दर्शन पास सुविधा बंद केल्याने या ठिकाणी अनेक एजंटांचा सुळसुळाट मात्र पाहावयास मिळत असून पैसे घेऊन भाविकांना आडमार्गाने दर्शन करून देत असल्याने सामान्य भाविकांना तासन्तास ताटकळत राहावे लागते आहे . असे चित्र असले तरी भाविकांचा उत्साह कायम आहे .
Post a Comment
0 Comments