Type Here to Get Search Results !

लवकरच सोने व्यवसाय कायद्यातील नियम बदलणार ; साताऱ्यात सुवर्णपारखी संघटनेच्या चर्चासत्रातील माहिती

लवकरच सोने व्यवसाय कायद्यातील नियम बदलणार ; साताऱ्यात सुवर्णपारखी संघटनेच्या चर्चासत्रातील माहिती



सातारा - विशेष प्रतिनिधी

सातारा सराफ असोसिएशन व सातारा जिल्हा सुवर्णकार सराफ असोसिएशन यांच्या वतीने व्यवसाय संबधी एक दिवसीय चर्चा सत्र संपन्न झाले . यात  515 सराफ सुवर्णकार बंधू सहभागी झाले होते .







ह्या चर्चा सत्र मध्ये गोल्ड व्हॅल्यूवर असोसिएशन तर्फे  राजेंद्र दिंडोरकर , चेतन राजापूरकर , सचिन वडनेरे व मुंबई येथील श्री पुरुषोत्तम काळे हजर होते . तसेच सांगली वरुण मान, पाश्चिम महाराष्ट्र प्रमुख योगेश जी कुलथे व अभिषेक  बेलवलकर हे  पूर्ण वेळ हजर होते .

भारतीय दंड विधान 411 वर तेथील प्रमुख पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले व उपस्थित सराफांद्वारे प्रश्नोत्तरे झाली .

लवकरच जुलै 2024 पासून भारतीय दंड विधान यातील काही तरतुदी व नियम हे भारतीय संविधान संहिता अंतर्गत बदल होण्याचे संकेत असून आपल्या व्यवसाय संबधित 411, 412,कलम बदलून 315, 316, 317, हे कलम लागु होतील , असेही संकेत आहेत.  त्यात काही चांगले वाईट बदल पण झाले आहेत , त्या संबधी चांगली माहिती मिळाली .

  हल्ली सोन्याचे वाढते भाव लक्ष्यात घेता जुनी दागिने मोडून त्यात भर टाकून नवीन दागिने घेण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यात जुनी दागिने मोडीत घेताना बनावट ,नकली , बांधवां दागिन्यांचे प्रमाण वाढले म्हणून असे दागिने कसे ओळखायचे ?  त्याचे शास्त्र शुद्ध परीक्षण कसे करायचे , g s t ,  हॉल मार्क , huid , यावर सुमारे दीड तासाचे प्रशिक्षण असोसिएशनच्या तज्ञ पदाधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक सह घेतले .


 जेष्ठ तज्ञ मा. सुरेंद्र मेहताजी यांनी pmpl म्हणजे मनी loundring कायद्या बाबत सखोल माहिती दिली . त्या कायद्यात होणारे बदल व त्या बाबत घेण्याची काळजी अशी अत्यंत उपयुक्त चर्चा झाली . होणारे बदल हे आपल्या व्यवसाय साठी घातक आहेत त्यासाठी काय केले पाहिजे .

सरकारला सराफ व्यवसाया तून मिळणारे Gst che उत्पन्न अपेक्षा पेक्षा खूप कमी होत आहे , असे वाटते म्हणून सरकार आपल्या व्यवसायात कडक कायदे अंमलबजावणी करणार असल्याचे समजते . म्हणून आपन काय खबरदारी घेतली पाहिजे ह्यावर सांगोपांग चर्चा झाली . राष्ट्रगीताने समारोप होऊन चहा पान होऊन कार्यक्रम संपन्न झाला .

Post a Comment

0 Comments