Type Here to Get Search Results !

या.. धार्मिक ठिकाणाच्या पिंडदानाचे महत्त्व कायम

बद्रीनाथ धाम यात्रा उत्साहात ; या धार्मिक ठिकाणाच्या पिंडदानाचे महत्त्व कायम 




बद्रीनाथ धाम - विशेष वृत्त

चार धाम यात्रेतील बद्रीनाथ धाम येथे भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र असून या ठिकाणी पिंडदान करणाऱ्या भाविकांची देखील संख्या वाढल्याचे चित्र आहे.


बद्रीनाथ धाम येथे जाण्यासाठी रुद्रप्रयाग येथून अत्यंत खडतर प्रवास अलकनंदा नदीच्य नदीकाठी रस्त्याने प्रवास करत भाविक बद्रीनाथ धामला पोहोचून दर्शन घेत आहेत .



या धार्मिक ठिकाणी करतात पिंडदान

चारधाम यात्रे पैकी बद्रीनाथ धाम हे देखील एक महत्त्वाचे धाम मानले जाते . 

यमुनोत्री , गंगोत्री नंतर पवित्र अशा केदारनाथ धाम दर्शनानंतर बद्रीनाथ धाम हे महत्त्वाचे मानले जाते . उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात तीन हजार मीटर उंचीवर बद्रीनाथ नदीवर वसलेले आहे .

बद्रीनाथ धामचे दर्शन झाल्याशिवाय चार धाम यात्रा पूर्ण होत नाही , असे म्हटले जाते . या धामाविषयी आणखी एक महत्त्व आहे , ते म्हणजे आपल्या पूर्वजांचे पीतरांचे या ठिकाणी पिंडदान केले जाते. 

बिहार मधील पितृगया येथे स्वर्गवासी वडिलांचे तर मातृगया येथे आईचे पिंडदान केले जाते . परंतु बद्रीनाथ धाम येथे सर्वांचेच पिंडदान करण्याचे महत्त्व आहे . पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की , पांडवकाळात त्यांनी त्यांच्या पूर्वजांचे पिंडदान याच ठिकाणी करून पुढे स्वर्गाचा रस्ता धरला होता . या मुळे बद्रीनाथ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते .

Post a Comment

0 Comments