Type Here to Get Search Results !

सुरत हैदराबाद हायवेच्या कर्नाटकातील व्हिडिओने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोटात गोळा

सुरत हैदराबाद हायवेच्या कर्नाटकातील व्हिडिओने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोटात गोळा





 राहुरी  - विशेष वृत्त

लोकसभा निवडणूक होतात पुन्हा प्रलंबित असणाऱ्या देशपातळीवरील विकास कामांबाबत सर्वत्र चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या सोशल मीडियावरील व्हिडिओची चर्चा सुरू असून नाशिक सुरत नाशिक नगर सोलापूर या ग्रीन फील्ड हायवे मध्ये जमिनी जाणाया शेतकऱ्यांच्या पोटात मात्र गोळा उठल्याचे चित्र दिसत आहे .



2018 मध्ये बहुचर्चित अशा सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे या मार्गाची निविदा एन एच ए आय कडून निघाली होती .


त्यानंतर आपल्या भागातून हा भव्य महामार्ग जाणार असल्याचे शेतकऱ्यांना समजले होते . नाशिकहून हा ग्रीन फिल्ड हायवे नगर जिल्ह्यातील संगमनेर राहता राहुरी नगर तालुक्यातून पुढे सोलापूर कडे जाणार आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे . त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे . देशातील दुसरा सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस हायवे चेन्नई सुरत ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे रायचूर जवळ तयार होत आहे.
हा ६ लेन मुख्यमार्ग रायचूर, यादगिर आणि कलबर्गी या कर्नाटक राज्या मधील जिल्हा मधून जाईल व प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणावर वाचवेल . अशी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे .
अर्थात चेन्नई इथून या ग्रीनफिल्ड हायवेच्या कामाला सुरुवात होत कर्नाटकातील रायचूर येथे पर्यंत या  हायवेचे काम प्रगतीपथावर असून या पुढील काळात महाराष्ट्रातील महामार्गाचा नंबर असल्यामुळे या सुरत चेन्नई हायवे अंतर्गत जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोटात मात्र गोळा उठल्याचे चित्र आहे . केंद्र सरकार यांनी भूसंपादनात मध्ये शेतकऱ्यांना किती लाभ होणार ?  ग्रीन फील्ड हायवे लगत सर्विस रोड मिळणार का ? हे प्रश्न मात्र कायम आहे .

Post a Comment

0 Comments