आप्पासाहेब ढूस लिखित अखेरचा हा तुला दंडवत पुस्तकाचे प्रकाशन..
आईचा शेवटचा श्वास शब्दबध्द झालेले जगातील हे पहिले पुस्तक - लेखक आ. लहू कानडे.
सर्वांच्या मदतीने देवळाली प्रवरा मध्ये अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभारणार - आप्पासाहेब ढूस
देवळाली प्रवरा -
देवळाली प्रवरा शहरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व.., तथा दि. राहुरी सह साखर कारखान्याचे मा. संचालक कै. भिमराज रामजी ढूस यांच्या पत्नी व देवळाली प्रवरा सोसायटीच्या माजी संचालिका आणि आंतरराष्ट्रिय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांच्या मातोश्री चांगुणाबाई भिमराज ढूस यांना सोमवार दि.२७/०५/२०२४ रोजी देवाज्ञा होऊन त्यांचेवर अंतिम संस्कार करणेत आले. तसेच त्यांचा दशक्रियाविधी सोमवार दि. ०५/०६/२०२४ रोजी देवळाली प्रवरा खटकळी येथे पार पडला असून तेरावा शनिवार दि.०८/०५/२०२४ रोजी स . ११.०० वा. देवळाली प्रवरा ढूस वस्ती येथे संपन्न झाला.
या तेराव्याच्या प्रसंगी.. आप्पासाहेब ढूस लिखित *आई.., अखेरचा हा तुला दंडवत* या प्रासंगिक पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करणेत आले..
प्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा लेखक लहू कानडे साहेब, प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या देवळाली प्रवरा येथील विजया बहेनजी, भाजपा चे प्रदेश प्रवक्ते नितीनजी दिनकर, प्रहार चे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे, श्री साईबाबा संस्थान चे विस्वस्त सचिनभाऊ गुजर, श्री त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख सितारामभाउ ढूस, भाजपा चे मा. प्रांत सदस्य आसारामभाउ ढूस, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर का, प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, पोलीस उप निरीक्षक संदीप संसारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देवळाली प्रवरा शहर प्रमुख केदारनाथ चव्हान, डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे मा. संचालक अरूण कोंडिराम ढूस, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष सुखदेवराव मुसमाडे, मुसमाडे अँड सन्स चे बाबासाहेब मुसमाडे, गोवर्धन गो शाळेचे संचालक लालितशेठ चोरडिया, साई आदर्श मल्टीस्टेट चे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू गिते, व्हा. चेअरमन आबासाहेब वाळूंज, माजी चेअरमन अन्नामामा चोथे, चित्रपट निर्माते दादा माने, एकनाथ कालंगडे, अशोकराव बोडखे, सोपानराव सौदागर, ऍड घाडगे, चॉईस बाजार चे रविणकुमार छाजेड, भुवनेश्वरी कृषी सेवा केंद्राचे अर्जुन गणपत ढूस, राहुरी फॅक्टरी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच प्रहार चे देवळाली प्रवरा शहर प्रमुख प्रकाश वाकळे, गणेश भालके, बाळासाहेब कराळे, बबनराव पटारे, विठ्ठल शेटे, दिपक पठारे, माजी नगरसेवक विस्वास पाटिल, राजेश मंचरे, अक्षय स्टील चे रवींद्र ढूस, भारत शेटे, विठ्ठल चव्हाण, कुमार भिंगारे, आदी मान्यवरांच्या हस्ते व शेकडो आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार आणि राजकिय, सामजिक, धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
प्रसंगी भावनाविवश होऊन बोलताना लेखक तथा श्रीरामपूरमत दारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार लहूजी कानडे साहेब बोलत होते..
ते म्हणाले की, वडिलांच्या जीवनावर आधारीत खूप सारे लिखाण सापडेल पण आईच्या जीवनातील शेवटचा श्वास शब्दबध्द झालेले हे पुस्तक जगातील पहिले आहे. खुप सुंदर आणि हृदय स्पर्शी असे लिखाण झाले आहे.. आजच्या तरुणाईला या पुस्तकाची खूप गरज आहे.. आईबद्दल लिहितांना गावात एक ग्रामीण रुग्णालय उभारले जावे याचे सामजिक भान त्यामधे आप्पासाहेब ढूस यांनी राखले असून आईचा खडतर असा जीवनपट त्यांनी समोर उभा केला आहे..
श्री साईबाबा संस्थान चे विस्वस्त सचिन गुजर यांनी प्रसंगी बोलतांना म्हंटले की, आप्पासाहेब ढूस यांनी लिहलेल्या या पुस्तकात त्यांनी आजच्या तरुणाईचा कान पिळला असून सोशल मीडिया च्या जगात वडीलधार्यांसोबत तरुणाईने कसे वागावे हे सांगीतले आहे..
प्रसंगी भाजपा चे प्रदेश प्रवक्ते नितिनजी दिनकर, प्रहार चे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष ललितशेठ चोरडिया, श्री त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख सिताराम ढूस आदींनी आपले मनोगत व्यक्त करून कै. चांगुणाबाई भिमराज ढूस यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रसंगी बोलतांना आप्पासाहेब ढूस म्हणाले की,
स्वामी तिन्ही जगाचा...आईविना भिकारी...
माझ्या आईच्या अश्या अचानक जाण्याने आज् खऱ्या अर्थानं मी आई विना भिकारी झालो.. पोरका झालो आहे.
आईचे प्रत्येकाच्या जीवनातील स्थान अढळ आहे... ज्यांना ज्यांना आपल्या आईची शेवटच्या क्षणी सेवा करायची संधी मिळाली ते सर्व भाग्यवंत आहेत... असे भाग्य मलाही लाभले आहे.., माझ्या आईने माझ्या हातावरच प्राण सोडले.. तो क्षण अत्यंत दुःखाचा जरी असला तरी कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचा म्हणून आयुष्यभर माझ्या आठवणीत राहील...!
आईचे छत्र हरपणे खूपच वेदना देणारे असते... अर्थात.., प्रत्येकाला जायचे आहेच, पण आपलं माणूस कसंही असलं तरी ते आपलं असतं.. व, त्याचं अस्तित्व हवे हवेसे वाटते.., पण, म्हणतात ना की, आले देवाजीच्या मना.. त्याप्रमाणे परमेश्वर इच्छेपुढे काही नसते....
माझ्या आईच्या अश्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला.. अंत्यविधी नंतर आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी आप्तेष्ट , नातेवाईक, मित्र परिवार, तसेच धार्मिक, राजकिय, सामजिक, कला, क्रीडा , साहित्य क्षेत्रातील पाचशे पेक्षा जास्त मान्यवर मंडळी दररोज दारावर भेटायला येवू लागली.. भेटल्यावर.. कसे झाले.! म्हणून आस्थेने विचारपूस करू लागली.. परंतू इतकी मोठी धक्कादायक घटना सर्वांना एका वाक्यात सांगणे शक्य नव्हते.. म्हणून घटनाक्रम शब्दबध्द करावासा वाटला.. आणि घटनेच्या चौथ्या दिवसी सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलेला घटनाक्रम अखेरचा हा तुला दंडवत या मथळ्या खाली थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला..
सोशल मीडियामध्ये पहाटे लेख प्रसिद्ध होताच लगेच ज्या तीन व्यक्तींनी मला फोन केले त्यांच्या बोलक्या प्रतिक्रियेने या लेखाचे पुस्तकात रूपांतर करायला प्रेरणा दिली..
भल्या पहाटे लेख प्रसिद्ध केल्यावर लगेच सकाळी सकाळीच मुसळवाडी येथुन एक फोन आला... फोन करणारे म्हणत होते की, अत्ता तुमचा लेख वाचला.. खुप गहिवरून आले... लगेच उठून आई जवळ जावून बसलो.. मला आज पत्नी सोबत काहीं कामा निमित्त पुण्याला जायचे होते.. पुणे कॅन्सल केलें.. आणि आज घरी राहून फक्त आईला वेळ देणार असल्याचे त्यांनी मला सांगीतले..
दुसऱ्या एका व्यक्तीचा राहुरितून फोन आला.. ते म्हणत होते की, आत्ता उठल्याबरोबर तुमचा लेख वाचला.. डोळ्यात पाणी आले.. लगेच उठून आई कूठे हे शोधू लागलो.. आई गोठ्यात गायांखाली झाडून घेत होती.. लगेच जाऊन तीच्या हातून झाडू काढून घेवुन बाजूला फेकला.. आणि, आईला घरात घेवुन आलो.. तिला घरात बसवून चहा दिला.. आईलाही समजेना नक्की काय झाले.. तिला लगेच आवरायचे सांगीतले.. म्हणालो.. चल तुला कोल्हार येथे मामाला भेटून आणतो.. हे ऐकल्यावर आईला काही समजेचना.. तिने नको म्हंटले.. म्हणाली आपन उद्या जाऊ.. आणि ते राहुरी येथून सरळ मला भेटायला देवळाली प्रवरा येथे आले.
त्यानंतर अहील्यानगर (अहमदनगर) येथून पोस्ट ऑफिस मध्ये काम करत असलेल्या एका व्यक्तीने फोन केला.. ते म्हणत होते की, तुमचा लेख वाचला आणि लगेचच गावी आईला फोन केला.. आणि सांगीतले की, उद्या मला सुट्टी आहे.. सकाळीं आवरून ठेव.. आता तुला माझे सोबत राहायचे आहे..
या आणि अश्या अनेक फोन कॉल मूळे सोशल मीडियाच्या जगात वाढत्या मोबाईल संस्कृतीमुळे घरातील वृद्ध माता पित्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि माणसा माणसा मध्ये वाढत चाललेली दरी व कमी होत असलेले एकमेकांवरील प्रेम यावर परिणामकारक असा हा लेख असल्याचं काहींनी मत व्यक्त केल्याने हा लेख पुस्तक रुपात प्रसिध्द करुन मातेला समर्पित करीत आहे.. शेवटी बोलतांना आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा व शेजारच्या ३२ गावांसाठी देवळाली प्रवरा मध्ये सर्वांच्या मदतीने अद्यावत व सुसज्य असे ग्रामीण रुग्णालय उभारणार असल्याचे व त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या देवळाली प्रवरा केंद्राच्या विजया बहेंनजी यांचे आत्मा या विषयावर प्रवचन झाले तर शेवटी आभाप्रदर्शन आप्पासाहेब ढूस यांनी केले तर सूत्र संचालन राजेश मनचरे यांनी केले..
Post a Comment
0 Comments