Type Here to Get Search Results !

मराठवाड्यातील धरणात केवळ 10% पाणीसाठा ; नाशिक विभागात 23 %

    राज्यातील धरणांमध्ये आजचा प्रकल्पीय (उपयुक्त) पाणीसाठा सुमारे 312.43 टी.एम.सी. म्हणजेच 21.84% इतकाच


                            ( संग्रहित छायाचित्र )

राहुरी -  विशेष  प्रतिनिधी 

                  सन 2024 च्या पावसाळ्यातील 2 जुलै 2024 रोजी चा राज्याच्या प्रमुख धरणांमधील एकुण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 312.43 टीएमसी म्हणजेच 21.84% इतकाच असून तो राज्याच्या सहा महसूल विभाग निहाय पुढील प्रमाणे असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त अभियंता इंजि. हरिश्चंद्र र चकोर यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .



 यापुढे नमूद करताना इंजि हरिश्चंद्र चकोर यांनी विषद केले की, राज्यातील प्रमुख धरणांचा (साठवण क्षमतेनुसार)एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 1430.63 टीएमसी इतका असून त्यापैकी 1)नागपूर विभागाचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे 162.70 टीएमसी इतका आहे असुन आज रोजी तोअंदाजे 57.53 टीएमसी म्हणजेच 35.36%इतका आहे. 2) अमरावती विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 136.75 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे 51.69 टीएमसी म्हणजे 37.80% इतका आहे . 3) मराठवाडा विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे 256.45 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे 24.67 टीएमसी म्हणजेच 9.62% टक्के इतका आहे. 4) नाशिक विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 209.61 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे 46.68 टीएमसी म्हणजेच 22.27% इतका आहे . 5) पुणे विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 537.28 टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे 87.62 टीएमसी म्हणजेच 16.31% इतका आहे . 6) कोकण विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा 130.84 टीएमसी इतका असून आज चा प्रकल्पीय पाणीसाठा अंदाजे 44.25 टीएमसी इतका म्हणजेच 33.82% इतका आहे . 

महत्वाचे म्हणजे अमरावती व नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त प्रकल्पीय पाणीसाठा अनुक्रमे 37.80% व 35.36% इतका असून मराठावाडा विभागात सर्वात कमी प्रकल्पीय पाणीसाठा म्हणजे 9.62 टक्के इतकाच आहे .त्यामुळे मोठ्या पावसाची आवश्यकता व प्रतिक्षा असून यापुढे उर्वरित तीन महिन्याच्या पावसाळा कालावधीत निश्चितपणे चांगला पाऊस पडून धरणे भरतील असा पूर्वीच्या पर्जन्यमान आकडेवारीवरून अंदाज करायला हरकत नसल्याचे श्री चकोर यांनी सांगितले . 

 याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे कोकणघाट माथ्यावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी प्राधान्याने गोदावरी खोरे(115TMC) , कृष्णा खोरे व तापी खोऱ्यामध्ये वळविणे अत्यंत गरजेचे असून त्या दृष्टीने राज्य व केंद्र सरकारने तातडीने पाणी वळविण्याचा कार्यक्रम अथवा नदी जोड प्रकल्प हाती घेऊन पावसाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या विभागांत व पाणी तुटीचे खोऱ्यांमध्ये पाणी वळविणे हे भविष्यात शेतीचे सिंचनासाठी व पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपयुक्त व अनिवार्य असल्याचे देखील अधोरेखित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments