Type Here to Get Search Results !

राज्यातील धरणसाठ्यात केवळ 14 % वाढ ; जायकवाडी पाणीसाठ्याची चिंता कायम

 राज्यातील धरणसाठ्यात केवळ 14 % वाढ ; जायकवाडी पाणीसाठ्याची चिंता कायम


    राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यात या वर्षी जुलै च्या तिसऱ्या आठवड्याअंती सुमारे १४.२३% (२०३.५७ टीएमसी)टक्के इतकी वाढ. आजचा २० जुलै रोजी चा प्रकल्पीय (उपयुक्त) पाणीसाठा सुमारे ५१५.९४ टी.एम.सी. म्हणजेच ३६.०७%         
( हरिश्चंद्र चकोर जल अभ्यासक सेवानिवृत्त अभियंता )               

सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त      

             सन 2024 च्या पावसाळ्यातील २० जुलै २०२४ रोजी चा राज्याच्या प्रमुख धरणांमधील एकुण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे ५१५.९४ टीएमसी म्हणजेच ३६.०७% इतकाच असून तो राज्याच्या सहा महसूल विभाग निहाय पुढील प्रमाणे असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे सेवा निवृत्त अभियंता इंजि. हरिश्चंद्र र चकोर यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

 यापुढे नमूद करताना इंजि हरिश्चंद्र चकोर यांनी विषद केले की, राज्यातील प्रमुख धरणांचा (साठवण क्षमतेनुसार)एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे १४३०.६७ टीएमसी इतका असून त्यापैकी                                

     1)नागपूर विभागाचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे १६२.७० टीएमसी इतका आहे असुन आज रोजी तोअंदाजे ७२.९६ टीएमसी म्हणजेच ४४.८४%इतका आहे.                                                    

     2) अमरावती विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा १३६.७५ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा हा अंदाजे ५९.७२ टीएमसी म्हणजे ४४.७१% इतका आहे .         

     3) मराठवाडा विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे २५६.४५ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे ३९.१४ टीएमसी म्हणजेच १५.२६% टक्के इतका 

    4) नाशिक विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा २०९.६१ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे ५८.४३ टीएमसी म्हणजेच २७.८६% इतका आहे 

     5) पुणे विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा ५३७.२८ टीएमसी इतका असून आजचा प्रकल्पीय पाणीसाठा सुमारे २०२.३९ टीएमसी म्हणजेच ३७.८७% इतका आहे .

    6) कोकण विभागातील धरणांचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा हा १३०.८४ टीएमसी इतका असून आज चा प्रकल्पीय पाणीसाठा अंदाजे ८२.८५ टीएमसी इतका म्हणजेच ६२.८५% इतका आहे . महत्वाचे म्हणजे कोकण, नागपूर विभागामध्ये सर्वात जास्त प्रकल्पीय पाणीसाठा अनुक्रमे ६२.८५% व ४४.८४% इतका असून मराठावाडा विभागात सर्वात कमी प्रकल्पीय पाणीसाठा म्हणजे १५.२६% टक्के इतकाच आहे .त्यामुळे मोठ्या पावसाची आवश्यकता व प्रतिक्षा असून यापुढे उर्वरित अडीच ते तीन महिन्याच्या पावसाळा कालावधीत निश्चितपणे चांगला पाऊस पडून धरणे भरतील असा पूर्वीच्या पर्जन्यमान आकडेवारीवरून अंदाज करायला हरकत नसल्याचे श्री चकोर यांनी सांगितले .                                

विशेष म्हणजे यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आजपर्यंत उजनी धरणात १९.१४ टीएमसी इतके व कोयना धरणामध्ये ३५.५४ टीएमसी इतके नवीन पाणी आले आहे . या जुलै महिन्याच्या गेल्या आठवड्यात कोकण घाट माथ्यावर पालघर पासून ते कोल्हापूर, तळकोकणा पर्यंत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने कोयना धरणात व पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून पाणीसाठ्यात देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. कोकण प्रदेश, पुणे , नागपूर ,अमरावती या विभागांतील धरणांचे पाणी साठ्यात देखील लक्षणीय वाढ झाली आहे .

मात्र मराठवाडा विभागासाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात अत्यल्प वाढ (केवळ ०.११%) झालेली असून ती चिंतेची बाब आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घाटमाथ्यावर देखील पावसाचे प्रमाण( घाटघर, हरिश्चंद्रगड ,रतनवाडी, भंडारदरा )दरवर्षीपेक्षा कमी झालेले निदर्शनास येत आहे . समाधानाची म्हणजे बाब म्हणजे भंडारदरा धरण्यात आज पर्यंत सुमारे 4626 दशलक्ष घनफूट इतकी नवीन पाण्याची आवक झाली असून भंडारदरा धरणाचाआजचा एकुण पाणीसाठा ५१२२ द.ल.घ.फुट म्हणजे ४६.४०% इतका झालेला आहे. मुळा धरणात देखील अंदाजे ३१२६ दलघफुट इतके नवीन पाणी आले असून मुळा धरणात ९०४९ दलघफुट (३४.८०%) इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी चे तुलनेत आजमितीच्या पाणी साठ्यापेक्षा निश्चितच दोन्ही धरणांमध्ये कमी पाणी साठा झालेला दिसतो आहे. उत्तर महाराष्ट्रासह खानदेशातील धरणांमध्ये देखील पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. खानदेशातील गिरणा धरणामध्ये तर ११.७४% टक्के इतकाच पाणीसाठा आहे.परंतु या पुढील काळात अजूनही पुढील दोन महिन्यात पुरेसा पाऊस पडून धरणे भरू शकतात. मात्र याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे कोकणघाट माथ्यावरील पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी प्राधान्याने गोदावरी खोरे(115TMC) , कृष्णा खोरे व तापी खोऱ्यामध्ये वळविणे अत्यंत गरजेचे असून त्या दृष्टीने राज्य व केंद्र सरकारने तातडीने पाणी वळविण्याचा कार्यक्रम अथवा नदी जोड प्रकल्प हाती घेऊन पावसाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या विभागांत व पाणी तुटीचे खोऱ्यांमध्ये पाणी वळविणे हे भविष्यात शेतीचे सिंचनासाठी व पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपयुक्त व अनिवार्य असल्याचे देखील अधोरेखित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments