Type Here to Get Search Results !

मुळाधरणाकडे विक्रमी 16 हजार 700 क्युसेकने आवक

मुळाधरणाकडे विक्रमी 16 हजार 700 क्युसेकने आवक



 राहुरी - विशेष वृत्त

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल झालेल्या तुफानी पर्जन्यवृष्टीने धरणाकडे झपाट्याने पाण्याची आवक होत आहे .

 आज सकाळी दहा वाजता कोतुळकडील येथील मुळा नदीतून मुळा धरणाकडे सव्वा चार मीटर ला तब्बल 16 हजार 750 क्युसेक वेगाने आवक सुरू होती . या हंगामातील ही सर्वात मोठ्या प्रमाणातील आवक मानली जात आहे .

 गेल्या दोन दिवसापासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे तुफान बॅटिंग सुरू आहे . हरिश्चंद्रगड कडील पाणलोटात मोठी पर्जन्यवृष्टी सुरू आहे . मुळा धरण साठा आज सकाळी दहा हजार 636 दशलक्ष फुटावर ( 41 टक्के ) पोहोचला तर पाण्याची पातळी १ हजार ७७७.२० इतकी झाली . 

24 तासात धरणात तब्बल पाउण टीएमसी पाणी जमा झाले . सकाळी कोतुळ येथून लहित खुर्द येथील जलमापन केंद्रावर धरणाकडे दहा हजार 342 क्युसेकने सुरू होती , त्यात सकाळी दहा वाजता आणखी वाढ होत 16 हजार 750 क्युसेक इतकी विक्रमी सुरू होती . पाण्याची आवक पाहता मुळा धरण दोन दिवसात निम्मे भरण्याची चिन्हे दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments