Type Here to Get Search Results !

राहुरी तहसीलचा तो कर्मचारी सापडला एसीबीच्या जाळ्यात

राहुरी तहसीलचा तो कर्मचारी सापडला एसीबीच्या जाळ्यात



राहुरी - विशेष वृत्त

जमिनीवर असलेलं महाराष्ट्र शासनाचं नाव कमी करण्यासाठी राहुरीतील महसूल कर्मचाऱ्याने २ हजार रुपये मागितले , मात्र तडजोडीअंती  दीड हजार घेतले . तक्रारदाराने अँटी करप्शन ला तक्रार केल्याने राहुरी येथील महसूल सहाय्यकाविरुद्ध रंगेहात पकडत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

राहुरी तहसील कार्यालय व त्यातील वेगवेगळे विभाग नेहमीच आर्थिक तडजोडीबाबत चर्चेत ठरले आहेत , त्यातच एका विभागातील कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने राहुरी तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे .

राहुरी तालुक्यातील एका गावात शेत जमीन असून त्यापैकी काही क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचं नाव आहे. सदरचं नाव हे कमी करायचं राहिलं असल्यामुळे तसं पत्र तलाठी यांना देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 2 रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1 हजार 500/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली.


सदरची लाच रक्कम पंचासमक्ष तहसील कार्यालय राहुरी इथं स्विकारल्यानं सुनील भागवत भवर ( वय- 46 वर्षे, पद- महसूल सहायक, वर्ग – 3,

नेमणूक – शासकीय वसुली विभाग, तहसील कार्यालय राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर

रा. आशिर्वाद बंगला, शेडगे मळा, श्रीरामपूर ता. श्रीरामपूर,जि. अहमदनगर ) या लोकसेवकाविरुद्ध राहुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.


ही कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घार्गे – वालावलकर ( पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

, माधव रेड्डी (अप्पर पोलिस अधिक्षक, ला. प्र. वि. नाशिक परिक्षेत्र नाशिक आणि नरेंद्र पवार ( वाचक पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी

श्रीमती छाया देवरे, ( पोलीस निरीक्षक, लाप्रवि, अहमदनगर , पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर यांच्यासह सापळा पथक पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई सचिन सुद्रुक, चालक पोलीस अंमलदार दशरथ लाड यांनी केली.



Post a Comment

0 Comments