राहुरी सोडून स्टेशनपर्यंत नागरिक कचेरीला जातील काय ?
राहुरी शहर प्रतिनिधी
राहुरी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती ह्या या शहराच्या बाहेर बिजगुणन प्रक्षेत्रावर बांधण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते तालुक्यातून येणाऱ्या जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे असून ते बाहेर हलवू नये अन्यथा या निर्णयविरुद्ध जन आंदोलन होण्याची शक्यता असल्याने या निर्णयचा फेर विचार व्हावा असे पत्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिले आहे.
माजी खासदार तनपुरे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की राहुरी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम राहुरी शहरापासून ४ कि.मी. अंतरावर असलेल्या बीज गुणन प्रक्षेत्राच्या जागेमध्ये करण्याचे शासनाने प्रस्तावित केलेले आहे. राहुरी हे तालुक्याचे मुख्यालय असून याठिकाणापासून इतक्या लांबच्या अंतरावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यास व्यापारी, नागरिक यांचा तीव्र विरोध आहे. वास्तविक राहुरी येथील सध्या असलेल्या तहसिल कचेरीसाठी ३.६० हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. याव्यतीरिक्त याठिकाण वन विभाग, गृह विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, सार्वजिनिक बांधकाम विभाग, गृहरक्षक दल, पशुसंवर्धन विभाग या विभागांच्या नांवावर जागा आहेत. या सर्व जागांचे एकत्रीकरण केल्यास ही एकुण उपलब्ध होणारी जागा ४ हेक्टर पेक्षा अधिक आहे. शासनाच्या सर्व विभागांसाठी प्रशासकीय इमारत होणार असल्याने प्रत्येक विभागास स्वतंत्र जागेची आवश्यकता नाही. अशा पध्दतीने सध्या अस्तित्वात असलेल्या जागेचे सात बारा सदरी एकत्रीकरण केल्यास या इमारत तालुक्याच्या मुख्यालयी बांधणे शक्य होईल. परंतू शासनाने बीज गुणन प्रक्षेत्राच्या जागेमध्ये इमारत बांधण्याचे प्रस्तावित केले असल्याने या निर्णयास सर्वच स्तरामधून विरोध होत असून याबाबत जनतेकडून आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राहुरी शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्याचबरोबर याठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या असल्याने याच ठिकाणी इमारत बांधणे आवश्यक आहे.
कृपया शासनाने प्रस्तावित केलेल्या बीज गुणन प्रक्षेत्राच्या जागेऎवजी सध्या असलेल्या तहसिल कार्यालयाच्या ठिकाणीच नविन प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत आवश्यक कार्यवाहीचे आदेश व्हावेत.
Post a Comment
0 Comments