राहुरी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारा विरोधात शिवसेनेचे धरणे आंदोलन
राहुरी - प्रतिनिधी
राहुरी नगर परिषदे समोर शिवसेनेच्या वतीने सोमवार दि.१५ जुलै रोजी नगर परिषदेने अनुकंप भरती बाबत श्री.कैलास शिंदे व श्री.अनिल जाधव यांच्यावर केलेल्या अन्याया विरोधात धरणे आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.
राहुरी नगर परिषदे समोर गेल्या आठ दिवसांपासून अनुकंप भरतीत अन्याय केल्यामुळे श्री.कैलास शिंदे व श्री.अनिल जाधव उपोषण करत आहेत.पालिका प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना ता.उपप्रमुख प्रशांत खळेकर,ता.संपर्क प्रमुख अशोक तनपुरे,युवसेना ता.प्रमुख वैभव तनपुरे,वांबोरी शहर प्रमुख अंकुश पवार,रोहित नालकर,अनिल आढाव,शिवाजी थोरात,अण्णासाहेब तोडमल उपस्थित होते.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे म्हणाले कि,पालिका प्रशासना समोर श्री.कैलास शिंदे व श्री.अनिल जाधव गेल्या आठ दिवसांपासून नगर पालिकेने अनुकंप भरती बाबत केलेल्या अन्याय विरोधात उपोषणास बसलेले आहेत.सदर आंदोलनाची दखल पालिका प्रशासनाने घेतलेली नाही.आंदोलना विषयी पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.ज्ञानेश्वर ठोंबरे यांची समक्ष भेट घेत तोडगा काढण्यासाठी पत्रव्यवहार करत चर्चा केली होती.परंतु राहुरी नगरपरिषद प्रशासनाने “शासन निर्णय अकंपा१२१७/प्र.क्र.१०२/आठ” नुसार अनुकंप भरती बाबत निर्णय घेणे अपेक्षित होते,तसे न करता गैरप्रकारे अनुकंप भरती करून सबंधित आंदोलकांवर अन्याय केला आहे.पालिका प्रशासनाने तात्काळ उपोषणकर्त्यांच्या मागण्याची दखल घेवून मागण्या मान्य न केल्यास शिवसेनेच्या वतीने कुठलीही पूर्व कल्पना न देता मुख्याधिकारी यांच्या दालनात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा श्री.देवेंद्र लांबे यांनी दिला आहे.
या प्रसंगी मिलिंद हरिश्चंद्रे,अरुण जाधव,मेजर नामदेव वांढेकर,बाप्पुसाहेब काळे,अशोक शेटे,विलास तनपुरे,दिपक अष्टेकर,प्रशांत लालबागे, महिला आघाडीच्या अनिता शिंदे, श्रीधर खळेकर,निलेश गुलदगड,शिंदे शुभम,विकास मोरे,अशोक ढसाळ,बाळासाहेब तोडमल,वसंत कदम,जालिंदर मुसमाडे,पांडुरंग देठे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट- पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका घेत अचानक रजेवर गेल्याची चर्चा पालिके मध्ये आलेल्या नागरिकांमध्ये होती.
*चौकट- पालिकेचे मुख्याधिकारी रजेवर असल्यामुळे तहसीलदार नामदेव पाटील यांनी शिवसेना ता.प्रमुख देवेंद्र लांबे यांच्याशी संपर्क साधत सायंकाळी तहसील कचेरी,राहुरी येथे पालिकेचे मुख्याधिकारी व शिवसेना आंदोलक यांच्याशी चर्चे साठी बैठक लावण्याचे कळविले, त्या नंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.*
Post a Comment
0 Comments