नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमतेचे मुळा धरण निम्मे भरले !
राहुरी ( प्रतिनिधी )
26 टीएमसी क्षमता असणारे मुळा धरण आज निम्मे भरले आहे.सायंकाळी उशिरा मुळा धरणाचा पाणीसाठा तेरा टीएमसी वर पोहोचला होता . सलग चौथ्या वर्षी मुळा धरण जुलै महिन्यातच निम्मे भरले आहे .
26 हजार दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या मुळा धरणाच्या पाणीसाठाकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते . यंदाच्या वर्षी पावसाची काय स्थिती राहील याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र मुळा धरणात मागील वर्षी 3 जुलै 2023 ला व यंदा 6 जुलै ला नव्याने पाणी दाखल झाले .
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता राजेंद्र पारखे , शाखा अभियंता विलास पाटील धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहेत .
जुलै महिन्यातच मुळा धरण निम्मे भरल्याने यंदाच्या वर्षी देखील धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्याचे चित्र मुळा लाभ क्षेत्रात राहुरी , पाथर्डी ,शेवगाव ,नेवासा ,नगर तालुक्यामध्ये दिसून येत आहे . गेल्या 23 वर्षांमध्ये मुळाधरण जुलै महिन्यात निम्मे भरण्याची यंदाची ही बारावी वेळ आहे.
आज सायंकाळी धरणाची पाणी पातळी 1784.00 इतकी झालेली होती तर 3.00 मीटर ला मुळा धरणाकडे ललित खुर्द कोतुळ कडून 11 हजार 227 पाण्याची आवक सुरू होती .
Post a Comment
0 Comments