Type Here to Get Search Results !

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली ठेकेदार व अधिकाऱ्यांची पोलखोल

 राहुरीच्या आठवडे बाजारात दाम दुपटीने करवसुली आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली ठेकेदार व अधिकाऱ्यांची पोलखोल 



राहुरी - विशेष वृत्त

राहुरी नगरपालिकेच्या आठवडे बाजारात कर वसुली करणारा ठेकेदार दाम दुपटीने वसुली करत असल्याचे गुरुवारी तनपुरे यांना निदर्शनास आली .



संबंधित पालिका अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची ही त्यांनी मागणी केली आहे . राहुरी नगरपालिकेवर सध्या गेल्या वर्षभरापासून प्रशासक राज्य असल्याने राहुरीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे . त्यातच आमदार तनपुरे यांनी सोशल मीडियावर ही पोलखोल केली आहे

आमदार तनपुरे यांनी सोशल मीडियावरील एक्स वर ट्विट केले आहे . गुरुवार हा राहुरी शहरातील आठवडी बाजाराचा दिवस. आज सहज बाजारात फेरफटका मारत असताना तेथील भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर असे जाणवले की, नगरपालिकेने आठवडी बाजार कर वसुलीसाठी ठेवलेला ठेकेदार शेतकऱ्यांकडून दामदुपटीने पैसे वसूल करत आहे. त्वरित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला आणि कडक कारवाईचे आदेश दिले.


तालुक्याच्या शहरात परिसरातील गोरगरीब शेतकरी मोठ्या आशेने शेतमाल विक्रीसाठी येत असतात. काबाडकष्ट करून पै-पै जमवत असतात. अशातच ठेकेदार शेतकऱ्यांची लूट करत आहेत. या ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. संबंधित ठेकेदारावर मेहरबान असणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्याची सूचना केली.


याशिवाही आतापर्यंत शेतकऱ्यांकडून उकळलेले अतिरिक्त पैसे ठेकेदाराकडून वसूल करून शेतकऱ्यांना परत द्यावे, अशी सक्त ताकीद दिली.

Post a Comment

0 Comments