Type Here to Get Search Results !

दुधाच्या दर वाढीसाठी राहुरीत शेतकऱ्यांनी रस्ता रोखला

 दुधाच्या दर वाढीसाठी राहुरीत शेतकऱ्यांनी रस्ता रोखला



राहुरी - विशेष वृत्त


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी , माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुरीत दुधाला सरसकट चाळीस रुपये लिटर भाव द्यावा व अन्य मागण्यासाठी सर्वपक्षीय संघटना , शेतकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन आज मंगळवारी करण्यात आले .

शासनाने दुधाला सरसकट 40 रुपये लिटर भाव द्यावा , मागील दुधाचे राहिलेले पाच रुपये अनुदान थेट दूध उत्पादकांच्या खात्यात त्वरित जमा करावेत , सरकारी शेतमालाची आयात निर्यात बाबत चुकीचे धोरण असल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी , खते , कीटकनाशक व शेती उपयोगी साहित्यावरील जीएसटी पूर्णपणे माफ करावी , या व विविध मागण्यांसाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड मार्ग शेतकऱ्यांनी आज रोखला .

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी , आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शासनावर प्रचंड रोष व्यक्त करत या मागण्या त्वरित मान्य करावेत अशी भूमिका घेतली . राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते . दोन्ही बाजूने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती . यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

Post a Comment

0 Comments