सात्रळच्या विद्यार्थ्यांनी केले ईव्हीएम मशिनद्वारे मतदान
सात्रळ - सुनील सात्रळकर ( पत्रकार )
रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी येथे लोकशाही पद्धतीने ईव्हीएम मशिनद्वारे लोकशाही पद्धतीने मतदान पार पडले.
अर्ज भरणे,अर्ज माघार घेणे अर्जाची छाननी, मतदान करणे, निकाल बरोबर आचारसंहितेचा कालवधी, निवडणुकीचा प्रचार यासारख्या बाबी लहान-लहान मुलांनी हुबेहूब नक्कल करून लोकशाहीचे धडे गिरवत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.
विद्यार्थी उमेदवारांना वटवृक्ष, पुस्तक,पेन, स्कूल बॅग,शाळा इमारत,अशी चिन्हे शाळेतील ठरवलेले शिक्षकांच्या निवडणूक आयोगाने दिले.तेव्हा उमेदवारांच्या कार्यकत्यांनी आप-आपल्या उमेदवारांचा चिन्हाद्वारे प्रचार केला.
शालेय वर्ग मंत्रीमंडळ निवडणूकीचे नियोजन विभाग प्रमुख विलास गभाले यांनी केले.
यावेळी निवडणूक आयोग म्हणून प्राचार्य राजेंद्र बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय अधिकारी म्हणून सच्चिदानंद झावरे , प्रकाश कुलथे, विलास गभाले यांनी कामकाज पाहिले केंद्राध्यक्ष वर्गशिक्षक आणि मतदान अधिकारी म्हणून वर्गातील हुशार मुलांनी मतदानाची कार्यवाही यशस्वीपणे पार पाडली.
यानंतर ईव्हीएम मशिनद्वारे निकालाची मोजणी करण्यात आली.. यावेळी विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले
इ.५ वी अ- मुस्ताकिम तांबोळी,५वी ब- प्रथमेश अंत्रे,६वी अ,६वी ब पियुष सोनवणे,७ वी अ-प्रणित सिनारे,इ.७ वी ब- यश सिनारे,इ.८ वी अ-अविष्कार पोकळे,इ.८वी ब- यश मोहारे-बिनविरोध,इ.९ वी अ-साई सिन्नरकर,इ.९ वी ब-साई गागरे,इ.९ वी क-प्रणित धोंडे,इ १० वी अ-अमोल आंधळे,इ-१०वी ब-जयदिप शिरसठ आणि इ.१० वी क प्रणव पलघडमल या विजयी उमेदवारांचा निकालानंतर सत्कार करण्यात आला..
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केशव मुसमाडे, सतिश नालकर, प्रा.विलास दिघे,प्रा.पंकज दिघे,प्रा.सतीश कदम,प्रा.अण्णासाहेब गोरडे,संजू दिघे,युनूस पठाण,भारत कोहकडे,ज्ञानदेव लेंडे, सुदर्शन गिते, वैभव वसावे, सुमेध शिंदे, देविदास थोरात, शिवदास सातपुते, सुनिता ढोकणे, गिताजंली गोसावी, प्रा.अर्चना बनसोडे,संगिता सांगळे,प्रविणा दिघे, कावेरी वदक,प्रमिला बनगये रत्नाकर सोनवणे, ज्ञानदेव माळी, राजू पेटारे,रामदास साबळे यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments