Type Here to Get Search Results !

मुळाच्या नवीन पाण्याचा धरणाच्या लोखंडी गेटला झाला स्पर्श

 मुळाच्या नवीन पाण्याचा धरणाच्या लोखंडी गेटला झाला स्पर्श



राहुरी - विशेष वृत्त 

 मुळा धरणात नवीन पाण्याची सातत्याने मोठ्या प्रमाणात सुरूच असून आज सकाळी नवीन पाण्याने धरणाच्या अकरा दरवाजांच्या तळाला स्पर्श केला . धरणाच्या गेटला पाणी लागल्याचे हे शुभ संकेत मानले जाते .



1 हजार 812 फूट पाणी पातळी असणाऱ्या 26 टीएमसी क्षमतेचा मुळा धरणात आज सकाळी 55% अर्थात 14 हजार 377 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे . पाण्याची पाण्याची पातळी १ हजार ७८७.७५ इतकी झाली आहे . दोन दिवसांपूर्वीच धरण निम्मी भरले . 1 हजार 787 फुटाला धरणाच्या अकरा दरवाजांच्या तळाला नवीन पाण्याचा स्पर्श होतो . 12.19 × 60.65 मीटर साईजचे मुळा धरणाचे 11 दरवाजे आहेत .

गेले तीन-चार दिवस झपाट्याने होणारी आवक आज कमी होतं दहा हजार क्युसेक वर आली आहे . 24 तासात धरणात एक टीएमसी पाणी जमा झाले. धरणाच्या तळाला पाण्याचा स्पर्श शुभ संकेत मानला गेला असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होण्याच्या आशा मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात पल्लवीत झाल्या आहेत .

जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही . डी . पाटील , शाखा अभियंता आर . जे. पारखे यांच्यातील देखरेखीखाली धरणाचे पूर नियंत्रण पातळी चा स्टाफ धरणाच्या पाणी पातळीकडे लक्ष देऊन आहे .

Post a Comment

0 Comments