राहुरीत ग्रामीण रुग्णालय , प्रशासकीय इमारतीवरून आजी-माजी आमदारांमध्ये तू .. तू .... मे.. मे
सतर्क खबरबात जिल्ह्याची - टीम कडून
राहुरी तालुक्यावर एका आमदारांनी दहा वर्षे सत्ता उपभोगली तर एका आमदारांना पाच वर्षे पूर्ण होतील ! राहुरी तालुक्याचे टॉप टेन प्रश्नांपैकी शहरातील सरकारी जागांवर असलेल्या प्रशासकीय इमारती शहरात की शहराबाहेर ? यावर या आजी-माजी आमदार महोदयांच्या वक्तव्यांवर राहुरी शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे .
सतर्क खबरबात जिल्ह्याची साठी आजी-माजी आमदारांचे म्हणणे आपण पाहूया ...
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रशासकीय इमारतीचा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा.डॉ. सुजय विखे पाटील व आमच्या प्रयत्नाने झाला हे विद्यमान लोकप्रतिनिधींचे अपयश असून ते झाकण्यासाठी आता प्रशासकीय कार्यालय शहराच्या बाहेर जाऊ नये अशी स्टंटबाजी विद्यमान आ.तनपुरे करत असल्याची टीका जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय शहराच्या बाहेर नेण्यास होणार आमदार तनपुरे यांनी विरोध केला आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटले आहे की, नगरपालिकेची अनेक वर्षांची सत्ता माजी राज्यमंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यात आहे. सन 2017 मध्ये आपण आमदार असताना प्रशासकीय कार्यालय इमारतीचा प्रश्न भाजपा-शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून मार्गी लावला होता. मात्र राहुरी नगरपालिकेची सत्ता असताना कामी सहकार्य न मिळाल्याने त्यावेळी देखील सदर प्रश्न रेंगाळला होता. सन 2019 मध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रशासकीय कार्यालय इमारतीचा प्रश्न मार्गी लावणे अपेक्षित होते परंतु त्यांच्याकडून सदरचा प्रश्न सुटला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून सध्याच्या सरकारने प्रशासकीय कार्यालय इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून सदरचा प्रश्न मार्गी लावला या कामी जिल्ह्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ सुजय विखे पाटील व आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासकीय कार्यालय इमारत योग्य ठिकाणी व्हावी याबाबत राहुरी तालुक्यातील नागरिकांचे मत काय आहे हे विद्यमान लोकप्रतिनिधी समजून घेत नाहीत. फक्त प्रशासकीय कार्यालय इमारत कामाचे श्रेय विखे व कर्डिले यांना मिळणार याचे तनपुरे यांना दुःख होत असल्याने व सदर कामात आलेले अपयश झाकण्यासाठी या कामाला त्यांनी विरोध सुरू केला आहे. राहुरी येथे प्रशासकीय कार्यालय इमारत झाल्यास त्या ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातून तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नाहीत त्यामुळे नवीन प्रशस्त जागेत सदरचे कार्यालय व्हावे अशी बहुसंख्य नागरिकांची मागणी व अपेक्षा आहे. परंतु केवळ राजकीय फायदा होईल या भावनेने विरोध सुरू आहे. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाची नौटंकी करून स्टंटबाजी करण्याचा प्रकार थांबवला पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेला विविध आश्वासने दिले. मात्र त्या कोणत्याही आश्वासनाची पूर्ती तनपुरे यांच्याकडून झाली नाही. राज्याच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली परंतु कामे झाले नाही. केवळ आंदोलन करून, बैठका घेऊन, पाहणी करून प्रश्न सुटत नाहीत तर सातत्याने पाठपुरावा करावा लागतो.
राहुरी शहरातील व्यापारी याबाबत निवेदन देण्यासाठी गेले बहुतांशी व्यापाऱ्यांना दबाव असल्याने जावे लागले असे काहींनी आपल्याला खाजगीत सांगितलेले आहे. राहुरी नगरपालिकेची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच ब्राह्मणी व इतर पाच गावांची पाणीपुरवठा योजना या आमच्या काळातच मंजूर झालेल्या असून सत्ता बदल झाल्यानंतर या योजनेचे श्रेय घेण्यासाठी स्थगिती देऊन पुन्हा उद्घाटन करून घेण्याचा अट्टाहास देखील तनपुरे यांनी केलेला आहे परंतु राहुरी तालुक्यातील जनता सुज्ञ असून त्यांना कोणी काम केले याची परिपूर्ण माहिती असल्याचेही माजी मंत्री कर्डिले यांनी म्हटले आहे.
राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्ष भिजत पडला आहे. आता सदर कामाचे टेंडर होऊन काम मार्गी लागले आहे. एका बाजूला आपल्याला सत्ताधारी निधी देत नाही असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिले असे सांगायचे ही जनतेची दिशाभूल असून याबाबत काही लेखी पुरावा असेल तर तो त्यांनी दाखवावा असेही कर्डिले यांनी म्हटले आहे.
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीचे ग्रामीण रुग्णालयाची इमारत राहुरी शहरापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर बांधण्याचा सत्ताधाऱ्यांचा राहुरी शहराची व्यापारी पेठ उध्वस्त करण्याचा डाव आहे , असा आरोप राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांवर केला आहे .
मात्र तालुक्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार असून ती इमारत राहुरी शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जागेवरच होणार असल्याची ग्वाही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की ग्रामीण रुग्णालयासाठी मी कित्येक वर्षापासून प्रामाणिकपणे पाठपुरावा करीत आहे ग्रामीण रुग्णालय हे राहुरी शहरातच व्हावे अशी माझी आग्रहाची भूमिका आहे कारण की येथे राहणाऱ्या पन्नास हजार लोकवस्तीसाठी इमारत राहुरी शहरातच होणं योग्य ठरणार आहे.
राहुरी शहरातून नगर मनमाड हा महामार्ग जात असल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रुग्णालय राहुरी शहरातच होण्यासाठी मी आग्रही आहे
रुग्णालय आहे त्या जागेचा मालकी हक्का विषयी काही वादप्रलंबित असल्याकारणाने बऱ्याचशा बैठका घेऊन मी व नगरपालिकेचे अधिकारी त्यांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या बैठका घेऊन वेगवेगळे प्रपोजल दिले आणि त्या जागेचा वाद कुठेतरी संपुष्टात आला. आणि त्याच वेळी दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि नवीन आलेल्या सरकारने मी येथील आमदार असताना देखील मला असो किंवा आणखी कोणी असो यांनी विश्वासात न घेता परस्पर जागा ठरविली.
यासंदर्भात मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये सातत्याने यावरती आवाज उठविला आहे
मी राहुरी शहरातील स्थानिक नागरिक असून आमदारही आहे त्यामुळे मला राहुरीकरांविषयी आधारा तिथे आहे आणि राहुरी होणाऱ्या सुख सुविधा साठी मी आग्रही आहे राहुरीत झालेल्या विकास कामांसाठी मी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपदी असताना भरपूर निधी आणलेला आहे व राहुरीच्या विकासात भर घातलेली असून हे दोघेही बाहेरचे आहेत एक नगरचे व दुसरे राहत्याचे त्यामुळे हे पाहुणे आहेत हे पाहुणे निघून जाणारच असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विखे कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.
सदरील विधानसभेत पालकमंत्र्यांनी देखील उत्तर देताना सांगितले की रुग्णालय राहुरी शहरांमध्येच योग्य आहे हे विधानसभेत त्यांचं वाक्य आहे.
आणि यासंदर्भात मी तुमच्या बरोबर बैठक घेणार आहे परंतु ती बैठक पुढे झालीच नाही का झाली नाही हे त्यांनाच माहिती.
दरम्यान या संदर्भात शहरातल्या लोकांच्या सोयीसाठी हे रुग्णालय होण्यासाठी त्यांनी पी डब्ल्यू इकडे पत्रव्यवहार केला व त्यामध्ये सुधारित अंदाजपत्रक आराखडे मागविले आहेत दरम्यान हे पत्र माझे नाही शासनाच्या एका विभागांनी दुसऱ्या विभागाला या पत्रामध्ये आमच्या विधान भवनामध्ये झालेल्या मीटिंगचा उल्लेख देखील केलेला आहे आणि त्या मीटिंगला अनुसरून रुग्णालय राहुरी शहरातच व्हावं असं स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेले आहे पीडब्ल्यूडी कडून परत अंदाजपत्रक आराखडे मागविले आहेत मग कुठेतरी कोणाच्या कामात त्या ठिकाणी ते आराखडे करण्यास सुरुवात केली त्याचा मला निश्चित आनंद आहे.
त्याचबरोबर राहुरी शहरामध्ये असलेले तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल ते शहराबाहेर नेण्याचा घाट सध्याच्या विद्यमान सरकारने मंडळीने घेतला आहे वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये इथे एकच पोलीस स्टेशनची इमारत आहे . तर आम्ही राहुरी शहरासाठी व राहुरी ग्रामीण साठी दुसरे पोलीस स्टेशन बांधण्याची मागणी केली होती . पोलीस वसाहतीचा देखील प्लॅन केला होता आणि तो प्लॅन आपण तात्कालीन गृहमंत्र्यापर्यंत नेला होता परंतु हे दोन्ही प्रस्ताव गुंडाळून ठेवल्या गेले. त्यामध्ये कोणालाही विश्वासात घेण्यात आलं नाही स्थानिक आमदार असो किंवा व्यापारी असतील किंवा नागरिक असतील त्यांच्यावर दबाव टाकला असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हे तर भाजपाचेच आहेत मग त्यांच्यावर आम्ही दबाव कसा टाकू शकतो? असा प्रतिप्रश्न आमदार तनपुरे यांनी केला
माजी आमदारांनी गेल्या पाच वर्षात राहुरी शहरासाठी कुठलाही निधी आणलेला नाही निवडणूक जवळ आली म्हणून कुठेतरी पेपर मध्ये आपला फोटो दिसला पाहिजे आणि निवडणूक जवळ आल्यावरच स्टेटमेंट देतात आणि आम्ही दबाव आणला असे सांगतात अरे आम्ही कोणावर दबाव आणला नाही आम्ही दबावाचे राजकारण करीत नाही आणि करणारही नाही असे ठामपणे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले. या गोष्टींमध्ये आपल्याला राजकारण करायचं नाही आम्ही लोकशाही मार्गाने सर्वांना बरोबर घेऊन राहण्याचे राजकारण करीत असतो मात्र तुम्ही दहा वर्षे आमदार असताना तुमच्याकडून ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न साधा सुटला नाही व तहसील कार्यालय पोलीस स्टेशनचा प्रश्न आम्ही अडीच वर्षाच्या काळामध्ये असताना या सर्व गोष्टींची मान्यता आणली फक्त ग्रामीण रुग्णालयाच्या जागाचा विषय थोडासा अवघड होता किचकट होता परंतु शहरातल्या आणि तालुक्यातल्या लोकांच्या नागरिकांच्या नेमका गरजेचं काय आहे त्यासाठी माझे अतोनात प्रयत्न चालू आहेत.
दरम्यान राहुरीतील ग्रामीण रुग्णालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन इत्यादी सरकारी कार्यालय राहुरी शहरात बाहेर नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असून यांना वेळीच ओळखा असे आमदार तनपुरे म्हणाले.
Post a Comment
0 Comments