Type Here to Get Search Results !

आढाव वकील दांपत्य खून खटलाप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

 आढाव वकील दांपत्य खून खटलाप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

राहुरी - विशेष वृत्त

राहुरी येथील आढाव वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आली होती. 
       ( आढाव वकिल दाम्पत्यांचे संग्रहित छायाचित्रे )

या घटनेमुळे राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली होती. या दुहेरी खून खटल्यात शनिवारी 20 (जुलै) सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे न्यायालयात हजर झाले .


राहुरी येथील ऍड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ऍड मनीषा राजाराम आढाव या वकील दांपत्याच्या खळबळजनक खून खटल्यापकरणी राहुरी तालुक्यात विविध संघटनांनी मोर्चे काढले होते व जिल्ह्यातील वकिलांनी कोर्टातील कामकाज बंद ठेवून या घटनेचा निषेध केला होता . यावेळी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यावेळी केली होती. त्यामुळे एक प्रकारे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांच्या रूपाने अधिक बळकटी मिळाली आहे .


वकिल दाम्पत्यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निघृण खून करण्यात आला. त्या दिवशी रात्री तालूक्यातील उंबरे येथील स्मशान भूमीतील विहिरीत आढाव दाम्पत्यांचे मृतदेह मिळून आले होते .

या घटनेतील किरण ऊर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग, रा- उंबरे, भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे, रा. येवले आखाडा, शुभम संजीत महाडिक, रा. मानोरी, हर्षल दत्तात्रय ढोकणे, रा. उंबरे, बबन सुनिल मोरे, रा. उंबरे या पाच आरोपींना पोलिस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेऊन गजाआड केले होते.


दरम्यान सदर हत्याकांडांचा तपास सीआयडी कडे वर्ग केला होता. दरम्यान जिल्ह्यासह राज्यभरातील वकिल संघाकडून मोर्चे व आंदोलन करण्यात आले. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. सदर खुन खटला ६ मे २०२४ रोजी अहमदनगर येथील रुग्णालयात सुरु झाला. 

शनिवार दि. २० जुलै रोजी ऍड. आढाव दाम्पत्य खून खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हजर झाले. आरोपी किरण दुशिंग याच्या वतीने एस. एस. पाठक व आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याच्या वतीने पी. के. फळे हे वकिल हजर झाले आहेत. दरम्यान आरोपी हर्षल दत्तात्रय ढोकणे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याचा अर्ज २० जुलै रोजी स्वीकारण्यात आला. तर आरोपी शुभम संदिप महाडिक याने देखील आज माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सदर खटला अहमदनगर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. यारलागड्डा यांच्या समोर सुरु आहे.

Post a Comment

0 Comments