श्रीक्षेत्र ताहाराबादला शेकडो दिंड्या दाखल ; रविवारी पाऊल घडीचा कार्यक्रम
राहुरी - विशेष प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील श्री संत कवी महीपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रति पंढरपूर भूमीत २९ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता आलेल्या २९६ व्या वर्षांची परंपरेनुसार पंढरपूर येथे गेलेल्या पायी दिंडी व पालखीचे व स्वागत ग्रामस्थांनी केले.
काल दि.३० जुलै रोजी सकाळी भिक्षा कार्यक्रम अभिषेक, काकडा आरती नैवेद्य देण्यात आला. दि ३१ जुलै रोजी एकादशी निमित्त सकाळी ११ वाजता हभप नाना महाराज गागरे यांचे हरि किर्तन, १२ वा मध्यान आरती दुपारी, ४ वाजता ह भ प सुभाष महाराज आहेर यांचे हरि किर्तन, रात्री ८ वाजता हभप एकनाथ महाराज चत्तर यांचे हरि किर्तन होणार. दि. १ ऑगस्ट रोजी काकडा भजन कुळधर्म कार्यक्रम पवमान अभिषेक व द्वादशी पारणे महाप्रसाद होईल तद्रंतर सकाळी १० वाजता ह भ प रामदास महाराज क्षीरसागर यांचे हरि, किर्तन दुपारी ४ वाजता हभप मनोहर महाराज सिनारे यांचे प्रवचन, रात्री आठ वाजता हभप विकास महाराज गायकवाड यांचे हरिकिर्तन, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी बाळकृष्ण महाराज कांबळे शास्त्री यांचे फडकऱ्यांचे काल्याचे किर्तन, दुपारी ४ वाजता देवस्थानचे मठाधिपती हभप महंत अर्जुन महाराज तनपुरे यांचे गोपाळ काल्याचे हरि किर्तन व दही हंडी होईल, दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी छबिना मिरवणूक, आरती शिळा गोपाळ काला ४ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता पाऊल घडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.
( श्री क्षेत्र तहाराबाद येथे धाकट्या एकादशी निमित्त भाविकांना आमदार प्राजक्त दादा तनपुरे मित्र मंडळाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले . )
पाऊल घडी कार्यक्रम झाल्यावर साक्षात पांडुरंगाची पाऊल उमटतात हे पाहण्यासाठी पंचकोशीतील ग्रामस्थांसह हजारो भाविक यामध्ये सहभागी होतात.
Post a Comment
0 Comments