Type Here to Get Search Results !

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू

 मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू

राहुरी - विशेष वृत्त



नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मुळा धरणात अखेर पाण्याची आवक सुरू झाली आहे .

 पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने आज सकाळी धरणात 2 हजार क्युसेकने कोतुळ येथील मुळा नदीतून आवक सुरू होती .मुळा धरण साठा 6 हजार दशलक्ष घनफूट इतका असून धरणाकडे पाण्याची आवक सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

मुळा धरणामध्ये गेल्या 5 - 6 वर्षांत जुलैच्या पहिल्याच आठवड्यात नव्याने पाणी दाखल झालेले आहे . तुलनेने धरण जुलै महिन्यातच निम्मे भरलेले असल्याने यंदाच्या वर्षीही धरण जुलैमध्ये भरणार काय ? याची चर्चा मुळा लाभक्षेत्रात सुरू झाली आहे .

नगर जिल्ह्याला जलसंजीवनी ठरलेल्या मुळा धरणात च्या पाण्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते . मागील वर्षी जॉय चक्रीवादळाने पावसाचे गणित महिनाभर उशिरा बदलले . असे असले तरी घाट माथ्यावर व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची दमदार हजेरी यावेळी दिसून आली . मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अंबित , पिंपळगाव खांड ही धरणे तुडुंब भरली आणि मुळा धरणाकडे पाण्याची पहिली आवक 3 जुलै 2023 ला सुरू झाली .

 गेल्या 6 - 7 वर्षात 4 जुलै 2018 , 8 जुलै 2019 , 8 जुलै 2020 , 9 जुलै 2022 ला नव्याने पाणी दाखल झालेले आहे . मागील वर्षी 3 जुलै 2023 ला नव्याने पाणी दाखल झाले आहे . गत तीन वर्षे धरण जुलै महिन्यातच निम्मे भरलेले आहे . गेल्या 10 - 11 वर्षात जुलैमध्ये सहा वेळा तर ऑगस्ट महिन्यात पाच वेळा धरण निम्मे भरलेले आहे . पावसाची परिस्थिती पाहता या महिन्यात धरण निम्मे भरणार काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे . 

Post a Comment

0 Comments