Type Here to Get Search Results !

गोगाबाबांच्या टेकडीवरील विशेष वृत्तांत

गोगाबाबांच्या टेकडीवरील विशेष वृत्तांत


 सतर्क खबरबात जिल्ह्याची  - पर्यटन विशेष वृत्त

गोगाबाबाची  टेकडी माहित नाही असा औरंगाबाद अर्थात संभाजीनगर मध्ये चुकून एखादा सापडेल ... कारणही तसेच आहे !!

पहा टेकडीवरील व्हिडिओ.....

 


संभाजीनगर मधील अनेक ऐतिहासिक , पौराणिक ठिकाणांबरोबरच नैसर्गिक ठिकाणे आपली ओळख कायम करून आहेत .औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजी नगर म्हटले की , समोर दिसते ते  वेरूळचा लेण्या आणि घृष्णेश्वराचे ज्योतिर्लिंग मंदिर सातारचा खंडोबा , देवगिरीचा किल्ला , बीबी का मकबरा, पान चक्की , सिद्धार्थ गार्डन , याबरोबरच अन्य काही अशी नैसर्गिक ठिकाणी आहे की तिथे भाविकांसह हौशी पर्यटकांची पावले आपोआप चालू लागतात . असंच एक नाव म्हणजे गोगाबाबाची टेकडी !! 


शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात एक छानशी मोठी टेकडी आहे . या टेकडीवर व पायथ्याशी प्रसिद्ध वीर गोगाबाबा यांचे मंदिर आहे . अलीकडच्या काळात हे भाविकांसह हौशी पर्यटक यांचे आकर्षण केंद्र बनले आहे . टेकडीच्या पायथ्यापासून अर्धा ते पाऊण तास चालल्यावर मंदिराचा माथा येतो . शनिवारी , रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हौशी पर्यटकांची गर्दी दिसून येते . आपण एकदा याल तर नक्की गोगाबाबाची टेकडी नक्की पहा.... 

Post a Comment

0 Comments