Type Here to Get Search Results !

राहुरी नगर परिषदेच्या मनमानी कारभारा बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार - देवेंद्र लांबे पा.

 राहुरी नगर परिषदेच्या मनमानी कारभारा बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार - देवेंद्र लांबे पा.



( राहुरी प्रतिनिधी )- 

 राहुरी नगरपरिषद मधील वर्ग ३ च्या रिक्त लिपीक पदावर कैलास विठ्ठल शिंदे यांचा वारस हक्क असताना सदर पदावर गैरप्रकारे दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कैलास शिंदे यांनी दि. ८ जूलै २०२४ रोजी सकाळ पासून राहुरी नगरपरिषद कार्यालया समोर आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे.

          या उपोषणाला भेट देत शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा. यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे राहुरी नगरपरिषदेत होत असलेल्या गैरप्रकार बाबत तक्रार दाखल केली आहे. 

 कैलास विठ्ठल शिंदे, रा.राहुरी, यांनी दि. ८ जूलै २०२४ रोजी पासून सहकुटुंब राहुरी नगरपरिषद कार्यालया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.कैलास शिंदे यांचे वडील कै. विठ्ठल पाराजी शिंदे हे राहुरी नगरपरिषद मध्ये लिपीक पदावर कार्यरत असतांना दि. १३ सप्टेंबर २००५ रोजी दिवंगत झाले. तेव्हापासून कैलास शिंदे हे गेल्या २० वर्षांपासून अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेत आहे. कै. विठ्ठल पाराजी शिंदे हे लिपीक या वर्ग ३ च्या पदावर कार्यरत होते. कैलास शिंदे यांच्याकडे वर्ग ३ चे पदासाठी आवश्यक असणारी सर्व पात्रता असून सदर लिपीक पदासाठी दावेदार प्रतिक्षा सुचीतील एकमेव उमेदवार आहे. असे असताना राहुरी नगरपरिषदेचे आस्थापना विभागाने कैलास शिंदे यांची दिशाभुल करुन डावलण्यात आले. 

      सदर उपोषणाबाबत राहुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. ज्ञानेश्वर ठोंबरे यांना कैलास शिंदे यांचे उपोषणाची तात्काळ दखल घेवून उचित कार्यवाही करण्याचे पत्र देत प्रत्यक्ष भेट देवेंद्र लांबे यांनी घेतली होती.परंतु मुख्याधिकारी ठोंबरे यांनी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबाला श्री.ठोंबरे हे जाणीपूर्वक उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहेत.अशाच प्रकारे राहुरी नगरपरिषदेचे आस्थापनेवरील व्हालमन पदावर श्री.अनिल जाधव यांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना अद्याप सेवेत सामावून घेतलेले नाही. रा. न.पा.चे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे हे मनमानी कारभार करत असून शासन निर्णय २१ सप्टेंबर २०१७ चा क्र. अकंपा १२१७/प्र. क्र.१०२/८ अवमान करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

त्यामुळे रा.न.पाचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांची चौकशी करून कार्यवाही व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख श्री.देवेंद्र लांबे पा.यांनी म्हंटले आहे.


*चौकट - सदरील उपोषणस्थळी मा.खा.सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव शिवसेना युवा नेते प्रशांत लोखंडे यांनी भेट घेत सदर प्रकरणातील गैरकारभार बाबत मा.खा.लोखंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची समक्ष भेट घेवून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे म्हंटले आहे.*


*चौकट - कैलास शिंदे यांच्या उपोषणाला ८ दिवस पूर्ण होत आहे,परंतु राहुरी नगरपरिषदेच्या निष्ठुर प्रशासनाने दखल घेतलेली नाही म्हणून नगरपरिषदेच्या मनमानी कारभारा विरोधात शिवसैनिक सोमवार दि.१५ रोजी उपोषणकर्ते शिंदे यांना पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन करणार.- देवेंद्र लांबे पा.शिवसेना राहुरी तालुका प्रमुख*

Post a Comment

0 Comments