Type Here to Get Search Results !

राहुरी कृषी विद्यापीठात अधिकाऱ्यांकडूनच जातीयवादाला खतपाणी ?

 राहुरी कृषी विद्यापीठात अधिकाऱ्यांकडूनच जातीयवादाला खतपाणी ? 



मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याच्या आरोपावरून दोन अधिकारी करणार उपोषण !

कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाकडून उपोषणाचा निषेध


राहुरी विद्यापीठ,  दि. 9 जुलै, 2024


         महात्मा फुले कृषी विद्यापीठातील दोन वरिष्ठ अधिकारी डॉ. मिलिंद आहिरे व डॉ. दिनकर कांबळे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांच्याकडून मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत असून त्या विरोधात 10 जुलैपासून उपोषणास बसण्याचे पत्र विद्यापीठाचे कुलसचिव यांना दिलेले आहे. सदर पत्राप्रमाणेच त्यासंबंधी प्रत त्यांनी अध्यक्ष, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ यांना पाठीम्ब्यासाठी पण दिलेली आहे.


           कर्मचारी समन्वय संघाने पदाधिकार्याच्या बैठकीमध्ये या तक्रारीवर सखोल चर्चा केली आणि सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


           महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही संस्था राज्यात आणि देशात एक नावाजलेली संस्था असून मागील 60 वर्षांमध्ये शास्त्रज्ञांनी, अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून या संस्थेच्या नावलौकिकात भर टाकलेली आहे. या कृषी विद्यापीठाला वेगवेगळ्या कुलगुरूंच्या रूपात वेळोवेळी सतत योग्य मार्गदर्शन लाभत गेलेले आहे. कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी गुण्या गोविंदाने आणि एकोप्याने आत्तापर्यंत कार्य करत आलेले आहेत. विद्यापीठातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कार्यशैली आणि परस्पर प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध बघून *महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एक कुटुंब आहे* असे फलक माजी कुलगुरू कै. डॉ. दत्ताजीराव साळुंखे यांनी विद्यापीठात लावले होते. विद्यापीठाच्या इतिहासात कधीही कुलगुरूंकडून मागासवर्गीय किंवा कोणत्याही एका विशिष्ट समुदायावर अन्याय झालेला नाही. 


             सध्या विद्यापीठाची परिस्थिती रिक्त पदांच्या बाबतीत अत्यंत गंभीर असताना सुद्धा कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य अतिशय चोख करत आहेत. त्यांना तितकीच खंबीर साथ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी देत आहेत याचा अनुभव नुकत्याचं झालेल्या अकरिडिटेशन व्हिसिट मध्ये आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी काही अधिकारी त्यांच्या वैयक्तिक प्रश्नाला सामाजिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असून मागासवर्गीय समुदायावरती कुलगुरू अन्याय करत असल्याचे चित्र तयार करत आहेत व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनोबला वरती परिणाम होत असून शिक्षण आणि संशोधनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. सदर दोन्ही अधिकाऱ्यांचे हे कार्य निश्चितच विद्यापीठाच्या नावलौकिकाला बाधा पोहोचवणारे असून कर्मचारी समन्वय संघ याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. 


           सध्या विद्यापीठात मध्यवर्ती परिसरात तीनही संचालक तसेच तीनही सहयोगी अधिष्ठाता मागासवर्गीय असून विभाग प्रमुखांमध्ये 50 ते 60 टक्के विभाग प्रमुख हे मागासवर्गीय आहेत. हीच परिस्थिती थोडाफार फरकाने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इतर महाविद्यालय व संशोधन केंद्रावरती आहे. त्यामुळे कोणत्याही पदाचा पदभार देताना कुठेही भेदभाव केल्याचे आढळून येत नाही. असे असताना सदर अधिकारी जो आरोप करत आहेत तो सामूहिक स्वरूपाचा नसून वैयक्तिक स्वरूपाचा आहे हे लगेच निदर्शनास येते. सदर अधिकारी जर उपोषणाला बसले तर कर्मचारी समन्वय संघ सुद्धा त्यांच्याविरुद्ध उपोषणाला विरोध करून समाज माध्यमांसमोर त्यांची खरी बाजू उघडकीस आणील. विद्यापीठाच्या हिताच्या विरुद्ध काम करत असल्यामुळे सदर अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी अशी सुद्धा शिफारस विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ प्रशासनाला करण्याच्या विचारात आहे.


**कर्मचारी समन्वय संघाने पदाधिकार्याच्या बैठकीमध्ये या तक्रारीवर सखोल चर्चा केली परंतु यामध्ये कुठलेही तथ्य आढळून येत नाही. सध्या विद्यापीठाची परिस्थिती रिक्त पदांच्या बाबतीत अत्यंत गंभीर असताना सुद्धा सन्माननीय कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील सर्वांना सोबत घेऊन विद्यापीठाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य अतिशय चोख करत आहेत. कोणत्याही पदाचा पदभार देताना कुठेही भेदभाव केल्याचे आढळून येत नाही.*

*-डॉ. संजय कोळसे, अध्यक्ष, म. फु. कृ.वि. कर्मचारी समन्वय संघ*

Post a Comment

0 Comments