Type Here to Get Search Results !

खेड्यांतील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत उठला विधानसभेत आवाज

 खेड्यांतील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत यांनी उठावला विधानसभेत आवाज



राहुरी - विशेष वृत्त


बिबट्यांचे मानवी वस्तीवरील वावर व वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासंदर्भात केंद्र सरकार करवी वन कायद्यात अनेक बदल करण्याची मागणी केली .

तनपुरे यांनी विधानसभेत कामकाजा दरम्यान म्हटले की , ग्रामीण भागात बिबट्यांची संख्या अमर्याद अशी झाली आहे . याबाबत संबंधित मंत्री महोदय अलंकारिक भाषेत उत्तर देत आहेत , हे समजण्या पलीकडे आहे .

 राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे नुकतेच लहान मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते . मानवी वस्त्यांवर बिबट्यांचा वावर व हल्ले वाढत जात असून बिबट्यांची संख्या देखील वाढत असल्याचे तनपुरे यांनी विधानसभेत लक्ष वेधले . बिबट्यांनी अक्षरशः खेड्या गावात वार्ड वाटून घेतल्यासारखे चित्र दिसत असल्याचा उपरोधिक टोलाही तनपुरे यांनी मारत बिबट्याच्या प्रजननावर अंकुश राखावा , त्यांची वाढलेली संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने केंद्र सरकारला त्यातील काही कायदे व त्यातील नियम बदलण्यास भाग पाडावे , असे सूचित केले . हे सरकार बिबट्या करता काम करणार की माणसं करता ? असे देखील तनपुरे यांनी उपरोधित भाषेत सभागृहात आपले म्हणणे मांडले . आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बिबट्यांचा वाढत्या हल्ल्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवल्याने अखेर ग्रामीण भागातील बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यान संदर्भात विधानसभेत राहुरीतून डरकाळी फोडण्यात आल्याची भावना राहुरी तालुक्यासह ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे .

Post a Comment

0 Comments