विठ्ठल नामाची शाळा भरली
सात्रळच्या आनंद गुरकुल शाळेच्या चिमुकल्यांची विठूनामाच्या गजरात निघाली दिंडी
सात्रळ :- सुनील सातरळकर
आराध्य दैवत विठ्ठल रुखमाई चा वेषात नटलेली बालक, वारकरी वेषातली बालगोपाल, पारंपरिक वेषातली नटलेल्या विध्यार्थिनी, पाल्यांच्या उत्साहात सामील होऊन पालकांचा विधार्थी विधार्थिनीच्या दिंडीत सहभाग, विठू नामाचा टाळ मृदूंगाचा साथीत गजर अश्या अतिशय भक्तिमय वातावरनात निघालेली सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल ची दिंडी चे कौतुक सर्वत्र ग्रामस्थ करत आहेत.
आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या आनंद गुरुकुल शाळेचा हार्दिक उपक्रम वाखान्याजोगा असून आपल्या विधार्थी विधार्थिनींना पारंपरिक सणवारांची, रूढी पद्धतीची माहिती व्हावी म्हणून वेग वेगळे उपक्रम राबविण्याचे या शाळेच्या मॅनेजिग समिती चा कल आहे. बाल गोपालांची ही दिंडी गावाच्या पेठेतून मार्गक्रमण करत धानोरे घाटावर सांगता झाली. दिंडीचे घरोघरी उत्साहात स्वागत होऊन पूजन झाले. ह्या दिंडी सोहळ्यात स्कूल कमिटीचे सदस्य डॉ. राहुल बोरा, सतिषशेट गांधी, आनंद गुरुकुलच्या प्रिन्सिपॉल अर्चना प्रधान, शिक्षक शिक्षिका, पालक ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी होते.
Post a Comment
0 Comments