Type Here to Get Search Results !

अखेर राहुरीचे जीर्ण बसस्थानक पाडायला प्रारंभ

अखेर राहुरीचे जीर्ण बसस्थानक पाडायला प्रारंभ




राहुरी प्रतिनिधी


पन्नास वर्षांपूर्वी बांधकाम झालेले नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध  असणारे तिसरे बस स्थानक म्हणून ख्याती असलेल्या राहुरी बसस्थानकाचा नूतन इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे .



पावणे चार कोटी रुपये खर्चाच्या नूतन इमारतीच्या कामाला प्रारंभ झाला असून आज माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत जुन्या व जीर्ण झालेल्या बस स्थानकाच्या इमारतीचे पाडकाम सुरू झाले आहे .

प्रवाशांसाठी बस स्थानकाच्या उत्तरेला पाच प्लॅटफॉर्म असणारे तात्पुरते शेड बांधण्यात आले असून पुढील सहा महिन्यांमध्ये बस स्थानकाची इमारत उभी राहणार आहे .

नवीन बस स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म सह कंट्रोल कॅबिन ,  परिवहन विभागाच्या चालक वाहकांसाठी विश्रामगृह , सौरऊर्जेवरील व्यवस्था अन्य सुविधा उपलब्ध असतील . पुढील काही काळासाठी प्रवाशांना नव्या शेडचा वापर करावा लागेल .
राहुरी तालुक्यातील महत्त्वाच्या टॉप टेन प्रश्नांपैकी एसटी स्टँड इमारतीचा प्रश्न कायम चर्चेत राहिलेला आहे . माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते . त्यांचे पुत्र आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले . पूर्वी 17 कोटी रुपये खर्चाच्या नूतन बसस्थानक इमारतीसह व्यापारी संकुल ,  सुलभ शौचालय विश्रामगृह असे अद्ययावत इमारतीचा आराखडा तनपुरे यांच्या पुढाकाराने करण्यात आला होता . कोरोना काळानंतर अनेक घडामोडी घडल्या . आता पावणेचार कोटी रुपये खर्चाची बस स्थानकाची इमारत होणार असून प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत नवीन शेडची पाहणी आणि जुन्या बस स्थानकाच्या पाडकामाला आज सुरुवात झाली . लवकरच राहुरीकरांना नवीन बस स्थानक पहावयास मिळणार आहे .

Post a Comment

0 Comments