राहुरी खुर्दच्या प्रियंका आघाव यांची जलसंपदा विभागात निवड
देवळाली प्रवरा - प्रतिनिधी
राहुरी खुर्द येथील प्रियंका अनिल आघाव यांनी सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य शासनाच्या जलसंपदा विभागात सातारा परिमंडळ येथे कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
प्रियंका आघाव यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राहुरीतील विद्यामंदिर प्रशाला येथे पूर्ण केले आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी सरळ सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन हे यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल कानिफनाथ निधी संस्थेत चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला. यावेळी भारत साळवे, अनिल आघाव,रफिक शेख, अबुबकार शेख, नितीन आढाव, निकिता जाधव, रामा गायकवाड,अमोल शिंदे, शनी आढाव आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments