खासदार पत्नीने शेतकऱ्यांसाठी चुलीवर केल्या भाकरी ; दूध व कांदा दरवाढीसाठी नगरात नवनिर्वाचित खा निलेश लंकेयांचे आंदोलन
नगर - विशेष प्रतिनिधी
नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून सुरू केलेल्या दूध व कांद्याचे भाववाढ संदर्भात शेतकरी जनआक्रोश आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील , खासदार सौ.सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात ,खासदार बजरंग आप्पा सोनवणे माजी मंत्री राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे आंदोलन स्थळी उपस्थित राहणार असल्याचे समजते.
कांदा व आणि दुधाला भाव मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सुरू झालेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असून आज सकाळी चक्क खासदार लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांसाठी चूल मांडून स्वयंपाकाला सुरुवात केली .
याची चर्चा नगर जिल्ह्यासह राज्यात होत असून आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी महाविकास आघाडीचे राज्यसह देशातील नेते मंडळींनी नगरकडे धाव घेतल्याची माहिती चर्चेत आली आहे .
नुकतेच लोकसभा निवडणुकीत पारनेरचे माजी आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तिकिटावर नगर दक्षिण मध्ये निवडून आले आहेत त्यांच्या कामाची व शैलीची चुणूक त्यांनी नगरसह दिल्लीतही दाखविलेली आहे .
लोकसभा आचारसंहिता संपताच लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा , यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी भजन , कीर्तन , जागरण गोंधळ करत असून आत्तापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय व शासनाकडून या आंदोलनाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही .
त्यातच खासदार लंके यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चूल मांडून थक्क शेतकऱ्यांसाठी स्वयंपाकाला सुरुवात केली , याची चर्चा सर्वत्र सुरू आहे .
या आंदोलनाला पाठिंबा व भेट देण्यासाठी राज्यासह देशभरातील नेते सहभागी होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनासह नगर जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी मात्र नक्कीच वाढल्याचे चित्र दिसून येत आहे .
Post a Comment
0 Comments